उन्हाच्या पाऱ्यामुळे मडक्यांची मागणी वाढली; नवी मुंबईसह पनवेलमध्ये दररोज शेकडो माठांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:49 AM2019-03-28T00:49:46+5:302019-03-28T00:50:04+5:30
उन्हाळा सुरू झाला की, घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांमुळे थंड पाणी पिण्याची इच्छा होते. साध्या पाण्यामुळे तहान भागत नसल्याने पारंपरिक पद्धतीने थंड होणाऱ्या मडक्यामधील पाण्याकडे नागरिक आकर्षित होऊ लागले आहेत.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : उन्हाळा सुरू झाला की, घामाच्या धारा आणि उन्हाच्या झळांमुळे थंड पाणी पिण्याची इच्छा होते. साध्या पाण्यामुळे तहान भागत नसल्याने पारंपरिक पद्धतीने थंड होणाऱ्या मडक्यामधील पाण्याकडे नागरिक आकर्षित होऊ लागले आहेत. त्यामुळे फ्रीजमुळे दुर्लक्षित झालेल्या मडक्याला मागणी वाढली आहे. यामुळे मडकी बनविणाºया कारागिरांनाही रोजगार प्राप्त झाला असून, नवी मुंबईसह पनवेलमध्ये दररोज शेकडो मडक्यांची विक्री होत आहे.
नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढले असून, पाणी थंड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने होणारा मडक्यांचा वापरदेखील वाढत आहे. फ्रीजमधील थंड पाणी कितीही प्यायले तरी तहान भागत नाही. तसेच उष्णतेत अतिथंड पाण्यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाºया आणि विसर पडलेल्या मडक्यांना मागणी वाढली आहे. राजस्थान, गुजरात आदी भागातून नवी मुंबईसह पनवेल शहरात दररोज हजारो मडकी विक्रीसाठी येत आहेत. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी नर्सरी आहेत. या नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मडकी विक्र ीसाठी उतरविण्यात येतात. मडकी आल्यावर त्यांना गेरू आणि सुरमा रंग देणे, मडक्यांना चकाकी येण्यासाठी पॉलिश करणे, नळ बसविणे, गोलाकार मडक्यांना सिमेंटचे पाय बसविणे आदी कामे करून त्यांना आकर्षक केले जाते. त्यानंतर ही मडकी विक्रेते तीनचाकी सायकल किंवा डोक्यावर मोठ्या टोपल्या घेऊन विक्री साठी शहरात फिरताना दिसत आहेत.
उन्हाळ्यामुळे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाºया मडक्यांना तसेच कारागीर, विक्र ी करणारे कामगार यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. यामुळे फ्रीजपेक्षा मडक्याच्या वापरास प्राधान्य दिले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात मडक्यांची मागणी मोठ्याा प्रमाणावर वाढली आहे. मडक्यांना रंग देणे, पॉलिश करणे, नळ आणि पाय बसविणे आदी काम केल्यावर मडक्यांची विक्र ी केली जाते. सध्या मागणी वाढल्याने कारागिरांना चांगला रोजगारदेखील प्राप्त होत आहे.
- शिवा साहू,
मडकेविक्रे ता