शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पंपांवर बोंबाबोंब, वाहनांच्या रांगा, काही ठिकाणी लागले "बंद"चे बोर्ड

By सूर्यकांत वाघमारे | Published: January 02, 2024 8:35 PM

Navi Mumbai : हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका अत्यावश्यक सेवेवर बसू लागला आहे. डिझेल, पेट्रोलचा पुरवठा बंद होण्याच्या भीतीने नागरिकांनी वाहनांच्या टाक्या फुल करण्यावर जोर देत पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती.

नवी मुंबई  -हिट अँड रन कायद्याविरोधात चालकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका अत्यावश्यक सेवेवर बसू लागला आहे. डिझेल, पेट्रोलचा पुरवठा बंद होण्याच्या भीतीने नागरिकांनी वाहनांच्या टाक्या फुल करण्यावर जोर देत पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. यामुळे काही पंपावरील साठा दुपारीच संपून पेट्रोल पंप बंद असल्याचे बोर्ड झळकवले होते.

कायद्याला विरोध दर्शवत अवजड वाहनांच्या चालकांनी सोमवारपासून अचानक आंदोलन पुकारले आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल यांचाही पुरवठा थांबून त्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ऐन वेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी मंगळवारी सकाळपासून वाहन धारकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. आंदोलन किती दिवस चालेल याची श्वाश्वती नसल्याने सर्वांकडूनच टाक्या फुल करून घेतल्या जात होत्या. दुचाकी, कार यासह लांबच्या मार्गावर धावणाऱ्या वाहनांचाही त्यात समावेश होता. यामुळे काही पेट्रोल पंपाच्या टाक्या दुपारीच रिकाम्या झाल्याने त्याठिकाणी "बंद" चे फलक लागले होते. यामुळे पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी अनेकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी धावाधाव करावी लागली.  

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपNavi Mumbaiनवी मुंबई