कळंबोली - एमजेपीच्या पंपाचा बिघाड झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून नवीन पनवेलमध्येपाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे दीपावलीच्या सणात रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी तर पिण्यासाठीही पाणी आले नसल्याच्या तक्र ारी रहिवाशांनी केल्या आहेत. अशी परिस्थिती सतत निर्माण होत असल्याने या बाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्याचबरोबर भोकरपाडा येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याशिवाय वायाळ येथील पंपातही बिघाड होत असल्याने नवीन पनवेल, कळंबोली आणि पनवेल शहरात पुरेसे पाणी येत नाही. अनियमित स्वरूपाच्या पाणीपुरवठ्याने सिडको आणि महापालिकेच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मंगळवारी एमजेपीच्या पंपाचा बिघाड झाल्याने रात्रीपासून पाण्याचा दाब कमी झाला. अगोदरच कमी पाणी येते, त्यात ही समस्या निर्माण झाल्याने नवीन पनवेलमध्ये पाणीच आले नाही. या वसाहतीची एकूण मागणी ४२ एमएलडी असताना काल फक्त २७ एमएलडीच पाणी मिळाल्याने पाण्याचे वाटप योग्य पद्धतीने झाले नाही. त्यामुळे सेक्टर-१ ते १९ सेक्टरमध्ये पाणी आलेच नाही. गेल्या तीन दिवसांपासून ही समस्या असल्याचे योगेश शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे ऐन दिवाळीत नवीन पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.एकीकडे महागाई आणि दुसरीकडे कचरा उचलला जात नाही आणि तिसरे म्हणजे पाणीच येत नाही हे कशाचे द्योतक आहे, अशी प्रतिक्रि या पुरुषोत्तम वैष्णव या रहिवाशांनी नोंदवली, या संदर्भात सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयात संपर्क साधला असता, एमजेपीकडून पाणी कमी दाबाने येत असल्याचे सांगण्यात आले.नवी मुंबईकडून पाणीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पंपाचा बिघाड झाल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा झाला नाही. दिवाळीत ही समस्या निर्माण झाल्याने नवीन पनवेलमध्ये मोठी ओरड निर्माण झाली. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेडून पाणी घेऊन ते देण्यात आले, त्यामुळे बुधवारी काही प्रमाणात दाब वाढला.
दिवाळीमध्येच पनवेलमध्ये पाण्याचा ठणठणाट सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:42 AM