मेट्रो पुलाच्या कामामुळे सीबीडी उड्डाणपुलावर वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 02:10 AM2016-01-05T02:10:06+5:302016-01-05T02:10:06+5:30
सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम हाती घेतल्याने सोमवापासून सायन - पनवेल महामार्गावर सीबीडी
नवी मुंबई : सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम हाती घेतल्याने सोमवापासून सायन - पनवेल महामार्गावर सीबीडी बेलापुर येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अवजड व प्रवासी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. यामुळे या परिसरातू जाणा-या प्रवाशांना वाहतूककोंडीची सामना करावा लागत आहे.
या मेट्रोच्या पुलाचे हे काम २१ डिसेंबरपासून सुरु होणार होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे या कामाला तात्पुरती स्थिगिती देण्यात आली होती. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाचे बसस्थानक १५० ते २०० मीटर अंतरापर्यंत पुढे सरकावून उड्डाणपुलाच्या शेवटच्या टोकापलीकडे बसथांबे हलविण्यात येणार असून याबाबत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या कामामुळे कसल्याही प्रकारचा अडचण निर्माण होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे.
वास्तविक कामाला सुरुवात झाली असून यामध्ये पुणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील तीन लेनपैकी दोन लेन सुरू ठेवल्या असून पुलावरून येणारी एक लेन बंद ठेवली जाणार आहे. अवजड वाहनांना सीबीडी उड्डाणपुलाखालून प्रवेशबंदी केली जाणार असून या वाहनांना सीबीडी सर्कल येथून डावीकडे वळण घेत उरण फाटा पुलाच्या खालून यू टर्न घेऊन सीबीडी उड्डाणपुलावरुन पुण्याकडे जाता येणार आहे. संध्याकाळच्या वेळेत या वाहतूक कोंडी होण्याची
दाट शक्यता असल्याने त्यानूसार नवी
मुंबई वाहतूक पोलीसांच्या वतीने
ठोस उपाययोजना राबविल्याची माहिती वाहतूक विभागाचे
पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी दिली.