खड्ड्यांमुळे महामार्गावर कोंडी, मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:27 AM2019-08-03T01:27:06+5:302019-08-03T01:27:18+5:30

संततधार सुरूच : सायन-पनवेल मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय

Dug on the highway due to the pits | खड्ड्यांमुळे महामार्गावर कोंडी, मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय

खड्ड्यांमुळे महामार्गावर कोंडी, मार्गावरील चालकांसह प्रवाशांची गैरसोय

Next

नवी मुंबई : शहरात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सायन - पनवेल मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा परिणाम वाहतूककोंडीवर होत असून शुक्रवारी उरणफाटा ते जुईनगरपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

पावसाळ्यात सायन-पनवेल मार्गावर पडणारे खड्डे दरवर्षी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पाऊस पडताच मार्गावर जागोजागी डांबर उघडून मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत असून वाहतूककोंडीचीही समस्या भेडसावत आहे. शुक्रवारी पुन्हा सायन-पनवेल मार्गावर सीबीडीकडे जाणाºया लेनवर वाहतूककोंडी झाली होती. उरणफाटा येथील पुलावर तसेच लगतच्या रस्त्यावर, शिरवणे पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे सीबीडीच्या दिशेने जाणाºया वाहनांची गती मंदावल्याने जुईनगरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

दररोज सकाळ- संध्याकाळ सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. ही वाहतूककोंडीची समस्या शुक्रवारी रात्रीपर्यंत कायम होती. मागील काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरूच असून शुक्रवारी ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक पाऊस नेरूळ विभागात पडला आहे. तर चार ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झालेली नाही. सातत्याने कोसळणाºया पावसामुळे शहरातील जनजीवनावर परिणाम होत आहे. सायन-पनवेल मार्गावर वाशी गावलगतही खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी खडी टाकण्यात आलेली आहे. परंतु खडी मार्गावर पसरली असल्याने दुचाकी घसरत आहेत.

विद्युत खांब कोसळला
मुसळधार पावसामुळे आग्रोळी येथील उड्डाणपुलावरील विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली. तिथल्या पथदिव्याचा खांब जीर्ण झाल्याने कोसळल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र हा खांब एखाद्या भरधाव वाहनावर अथवा समोर कोसळला असता तर मोठा अपघात घडला असता. तर हा खांब कोसळल्यानंतरही बराच वेळ रस्त्यावरच पडलेला होता. यामुळे उघड्यावर पडलेल्या वीजवाहिन्यांचा धोका निर्माण झाला होता. परिवहन सदस्य समीर बागवान यांनी ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून तिथला वीज प्रवाह खंडित करण्यास कळविले तसेच जीर्ण झालेले खांब बदलण्याचीही मागणी केली.

दिवसभरात ३८ मिमी पाऊस
शुक्रवारी दिवसभरात शहरात ३८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी बेलापूर विभागात ४२ मिमी, नेरूळ विभागात ४५ मिमी, वाशी विभागात ३१ मिमी तर ऐरोली विभागात ३४ मिमी पाऊस कोसळला. या वेळी जोराच्या सुटलेल्या वाºयामुळे चार ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्यादेखील घटना घडल्या.

Web Title: Dug on the highway due to the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.