वैभव गायकरपनवेल : तहसील कार्यालयात सध्या जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होताना दिसते. कामकाजात पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सहा वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच तालुक्यात कार्यरत असलेल्या अधिकाºयाची तालुक्याबाहेर बदली केली जाते. मात्र, पनवेल तहसील कार्यालयात कार्यकाळ उलटूनही अनेक कर्मचारी एका जागेवर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मोरबे येथील मंडळ अधिकारी महेश भाट याला लाच घेताना गुरुवारी लाचलुचपत खात्याने पकडल्याने पनवेल तहसील कार्यालय चर्चेत आले आहे. भाट याची तत्कालीन जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी चुकीची नोंद केल्या प्रकरणी मोरबे मंडळ अधिकारी पदावरून तळा या ठिकाणी बदली केली होती. मात्र, काही महिन्यांतच भाट पूर्वीच्या जागेवर मंडळ अधिकारी म्हणून रु जू झाला.पनवेल तालुक्याचे वाढते महत्त्व, जमिनींना प्राप्त झालेला सोन्याचा भाव पाहता, अनेक अधिकारी पनवेल सोडण्यास तयार नाहीत. अनेक जण महसूल विभागातच तळ ठोकून बसले आहेत.
पनवेल तहसील कार्यालयात अशाच प्रकारे सर्रास शासकीय नियम पायदळी तुडविले जात आहेत. पुरवठा विभागात नेमलेले कर्मचारी, महसूल विभागात अनेक वर्षे कार्यरत आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यामार्फत खासगी कर्मचारी कामाला ठेवल्याचे दिसून येत आहे. या खासगी कर्मचाºयांना पगार कोठून दिला जातो, हा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांकडून सर्वसामान्यांची पिळवणूक केली जात आहे.
पनवेल तालुक्यात जमिनींना प्राप्त झालेला सोन्याचा भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील अनेक अधिकारी पनवेल तहसील कार्यालयातील नियुक्तीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. अनेक जण राजकीय वरदहस्ताने या ठिकाणी रुजू आहेत. तर काही कर्मचारी कार्यकाळ संपूनही जागा सोडण्यास तयार नाहीत. कार्यकाळ संपुष्टात येऊनही अधिकाºयांच्या बदल्या होत नसल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम सरकारी पातळीवर होत असल्याचे दिसून येत आहे.कार्यकाळ संपुष्टातआलेले अधिकारीच्पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांचाही कार्यकाळ संपुष्टात आला आहे. याशिवाय कविता कांबळे यांची बदली पुरवठा विभागात लिपिक म्हणून असताना त्या महसूल विभागात कार्यरत आहेत. ८ जून २०१२ रोजी कांबळे यांची नियुक्ती पनवेल तहसील कार्यालयात झाली आहे. सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्या या ठिकाणी कार्यरत आहेत.च्समीर शेख यांचीदेखील पुरवठा विभागात लिपिक म्हणून नियुक्ती असताना ते महसूल विभागात कार्यरत आहेत. १५ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे.महसुली कामकाजामुळे काही अधिकाºयांना चार्ज सोडण्यास विलंब होत आहे. मात्र बदली होऊनही अनेक वर्षे रुजू होत नसलेल्या कर्मचाºयांची योग्य ती चौकशी होऊन कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड