वर्षभरात अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 11:40 PM2020-01-08T23:40:10+5:302020-01-08T23:40:17+5:30

पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे.

During the year, two and a half crore issues were collected | वर्षभरात अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

वर्षभरात अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Next

सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांतील सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना परत केला जाणार आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करण्यापेक्षा त्यामध्ये गेलेला ऐवज परत मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. चोरी अथवा घरफोडी किंवा इतर गुन्ह्याच्या मार्गाने मिळवलेला ऐवजाची गुन्हेगाराकडून विल्हेवाट लावली जाते. तर रोख रकमेची चोरी झाल्यास तो पैसाही खर्च केला जातो किंवा इतर गोष्टीत त्याची गुंतवणूक केली जाते, त्यामुळे अशा गुन्ह्याच्या तपासात गुन्हेगार हाती लागल्यानंतरही त्याने चोरलेल्या ऐवजाची वसुली कशी करायची? असा प्रश्न पोलिसांपुढेअसतो. तर अनेकदा सराईत गुन्हेगार पकडल्यानंतरही ते गुन्ह्यातील ऐवज लपवल्याचे ठिकाण पोलिसांना सांगण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार पकडल्यानंतरही त्यामधील चोरीचा ऐवज परत मिळत नाही. अथवा चोरीला गेल्याच्या तुलनेत जप्त झालेला ऐवज अत्यंत कमी असतो. त्यामुळे तक्रारदारांकडून पोलिसांप्रति काहीशी नाराजीही व्यक्त केली जाते. यानंतरही पोलिसांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून तक्रारदारांचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो, त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षात घडलेल्या गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांमधील दोन कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गुन्हे शाखा पोलीस, परिमंडळ-एक तसेच परिमंडळ-दोन मधील पोलिसांनी हा ऐवज हस्तगत केला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, वाहने यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते, त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई पोलिसांकडून हा मुद्देमाल संबंधितांना परत दिला जाणार आहे.
गुरुवारी पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रमांतर्गत संबंधित ८३ तक्रारदारांकडे त्यांचा ऐवज सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पुन्हा हाती पडल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलणार आहे. गतवर्षीही अशा स्वरूपाचा कार्यक्रम नवी मुंबई पोलिसांनी घेऊन त्यामध्ये १९१ गुन्ह्यांतील चार कोटी तीन लाखांचा ऐवज संबंधित तक्रारदारांना परत केला होता.

Web Title: During the year, two and a half crore issues were collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.