शहरामध्ये दसरा उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:37 AM2017-10-01T05:37:05+5:302017-10-01T05:37:13+5:30
पनवेलसह नवी मुंबईमध्ये दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाशीमध्ये आयोजित महादौडमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते.
नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबईमध्ये दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने वाशीमध्ये आयोजित महादौडमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये देवीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
नवी मुंबईमधील सर्वच विसर्जन तलावांमध्ये देवीला निरोप देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सर्वच तलावांवर विसर्जन सुरू होते. तुर्भे पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या तलावामध्ये विसर्जन करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी फटाके व ढोल-ताशे वाजविण्यास सुरुवात केली. वसाहतीजवळ फटाके वाजवू नये, असे आवाहन पोलिसांनी केल्यानंतरही नागरिकांनी ऐकले नाही. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळ मिरवणूक थांबविण्यात आली होती. नागरिक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाºयांनी समजून काढल्यानंतर पुन्हा मिरवणूक सुरू झाली.
श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रीमध्ये १४ ठिकाणी दुर्गा दौडचे आयोजन केले होते. दसºया दिवशी सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकामधून पूर्ण वाशी परिसरामध्ये महादौडचे आयोजन केले होते. भगवे फेटे परिधान केलेल्या शेकडो धारकºयांनी सर्र्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सांगलीमध्ये संभाजी भिडे गुरुजींनी यावर्षीची गडकोट मोहीम प्रतापगड ते रायरेश्वर दरम्यान आयोजित केल्याची घोषणा केली असून, याविषयी माहिती या वेळी देण्यात आली.
खरेदीसाठी गर्दी
दसºयानिमित्त सोने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. शासनाने जीएसटीची घोषणा केल्यानंतर सोन्याच्या व्यवसायामध्ये मंदीचे वातावरण होते. दसºयानिमित्ताने ग्राहकांनी खरेदीसाठी केल्याने मार्केटमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र होते. दसºयानिमित्ताने यावर्षीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीला जास्त पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले.