जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य; धुळीसोबत महामार्गावर लहान खडीच्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:23 PM2023-01-28T19:23:40+5:302023-01-28T19:25:34+5:30

कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना  श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे.

Dust reigns on JNPT highway; An increase in the amount of small gravel on the highway along with the dust | जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य; धुळीसोबत महामार्गावर लहान खडीच्या प्रमाणात वाढ

जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य; धुळीसोबत महामार्गावर लहान खडीच्या प्रमाणात वाढ

googlenewsNext

कळंबोली , अरुणकुमार मेहत्रे  : कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना  श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे. त्याचबरोबर महामार्गावर लहान खडी जमा झाल्याने  दुचाकी वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरुन गाडी चालवावी लागत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणा जागे होणार का ? असा सवाल वाहनचालकाकडून केला  जात आहे. 

कळंबोली एमजीएम रुग्णालयापासून जेएनपीटी महामार्गाला सुरुवात होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्शवभुमीवर तेसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यामातून आठ लेन असलेला महमार्ग बांधण्यात आला आहे.  गोवा , पुणे , जेएनपीटी जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. २०१६ साली बांधण्यात आलेल्या महामार्गकडे प्राधिकरणाकडून  दुर्लक्ष केल्याने महामार्गवर लहान खडी , धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. या ठिकाणी चार टर्मिनस आहेत. तेथून मालाची निर्यात आयात केली जाते. वर्षाला येथे लाखो कंटेनेर हाताळले जातात. त्यामुळे  कळंबोली ते जेएनपीटी दरम्यान अवजड वाहतूक दिवसेनदिवस वाढत चालली आहे. भरधाव वेगाने धावना-या अवजड वाहतुकीमुळे अपघाताच्या समस्येने डोके वर काढले आहे. त्यात आता धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला  आहे. या दरम्यान महामार्गालगत  अनेक खेडी गावे आहेत.त्यामुळे अनेकजन दुचाकीवरुन प्रवास करतात. महामार्गावर  लहान खडी जमा झाल्याने दुचाकी स्वारांना गाडी चालवताना त्रास होतो आहे. महामार्गावर  अवजड वाहन  सुसाट  धावतात. त्यात धुळीत समोरचे काहीच दिसत नाही. लहान खडीमुळे लहान गाड्या घसरण्याचा प्रकार होत आहे. त्यातून अपघाताला आमंत्रण मिळते आहे. 

महामार्गवरील पार्किंग समस्या बिकट 

कळंबोली सर्कल ते डी पॉईँट येथून जेएनपीटी महामार्गावर दोन्ही बाजूने अवजड वाहतूकीची पार्किंग केली जातात. त्यामुळे महामार्ग वाहतूकीसाठी लहान झाला आहे. त्यात धुळीचे  साम्राज्य पसरल्याने समोरील किंवा बाजूला थांबलेली वाहने दिसत नाहीत. अशात अपघात होतात. त्यास पार्किंग केलेली  वाहने देखिल तितकेच जबाबदार असल्याचे वाहनचालक सांगतात. 

उपाययोजनांचा अभाव 

महामार्गावर शेजारी असणा-या कंटेनर यार्डमुळे यार्डात असणारी धुळ महामार्गावर येत आहे. त्या सोबत लहान खडी रसत्यावर येत आहे. ही धुळ व खडी दोन किमी पर्यंत पसरते आहे. ठिकठिकाणी फलक नसल्याने वाहनचालकांना दिशाभूल होत आहे. अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी  कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्याता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Dust reigns on JNPT highway; An increase in the amount of small gravel on the highway along with the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई