बाजार समितीमध्ये ई लिलावगृहाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:08 AM2019-02-01T01:08:37+5:302019-02-01T01:09:05+5:30
शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा; कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही सुरू
नवी मुंबई : बाजार समितीने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. केंद्र शासनाच्या ई - नाम योजनेअंतर्गत ई लिलावगृह व कृषी माल गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू केले आहे.
पणन संचालक दीपक तावरे यांच्या उपस्थितीमध्ये असेर्इंग लॅब व ई लिलावगृहाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील शेतकºयांना उच्चतम बाजारभाव व ग्राहकांना दर्जेदार शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून तावरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्याचे सहकार आयुक्त व बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी शेतकºयांचे व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या सुविधा उपलब्ध केल्याची माहिती यावेळी दिली. अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई ही राज्यातील एकमेव बाजार समिती ठरणार आहे. ई लिलावगृहामुळे शेतीमालाच्या लिलावामध्ये पारदर्शकता येणार आहे. येथील प्रयोगशाळेत शेतीमालाच्या गुणवत्तेची चाचणी करण्याकरिता प्रशिक्षित कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध यंत्राद्वारे कृषीमालाची गुणवत्ता तपासली जाणार आहे. कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार यांनीही मुंबई बाजार समितीचा प्रकल्प देशातील इतर संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण, अविनाश देशपांडे, अशोक गाडे, व्ही.बी. बिरादार, आर. आर. खिस्ते, एम. एम. मोहाडे, मंदार साळवी, एम. के. बेपारी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.