पनवेल महानगरपालिका हद्दीत धावणार ई-रिक्षा

By admin | Published: November 9, 2016 04:03 AM2016-11-09T04:03:06+5:302016-11-09T04:03:06+5:30

दिवसेंदिवस पनवेल आणि परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे याठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी उत्कर्ष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने महापालिका आयुक्त

E-rickshaw to run in Panvel municipal limits | पनवेल महानगरपालिका हद्दीत धावणार ई-रिक्षा

पनवेल महानगरपालिका हद्दीत धावणार ई-रिक्षा

Next

पनवेल : दिवसेंदिवस पनवेल आणि परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे याठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी उत्कर्ष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन केली.
उत्कर्ष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी नगरसेवक सुभाष भुजबळ, अध्यक्ष राकेश भुजबळ व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका हद्दीत शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दररोज हजारो खासगी वाहनांची शहरात वर्दळ असते. त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषणात मोठी वाढ होत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. याला पर्याय म्हणून शहरात ई-रिक्षा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी मंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मंडळाच्या माध्यमातून काही तरुणांना ई-रिक्षा घेण्यास मदत करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: E-rickshaw to run in Panvel municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.