महिनाभराने खा भरपूर आंबा; आवक वाढणार, सामान्यांनाही परवडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:15 AM2022-03-17T07:15:38+5:302022-03-17T07:15:45+5:30

रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक होत आहे.

Eat plenty of mangoes throughout the month; Income will increase, even the common man will be able to afford it | महिनाभराने खा भरपूर आंबा; आवक वाढणार, सामान्यांनाही परवडणार

महिनाभराने खा भरपूर आंबा; आवक वाढणार, सामान्यांनाही परवडणार

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी १४ हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये ३०० ते १२००  रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते २ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढणार असून, बाजारभावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.            

रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक होत आहे. बुधवारी ३७७ टन हापूस विक्रीसाठी आला. ५ ते ७ डझनच्या पेटीला २ ते ५ हजार रुपये भाव मिळत आहे. यावर्षी काेकणात हापूसचे उत्पादन चांगले असून, बाजार समितीमध्ये नियमित आवक सुरू झाली आहे.

२० एप्रिलपासून आवक वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल व मेमध्ये रोज ५० हजार पेट्यांपेक्षा जास्त आवक होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हापूसची निर्यातही सुरू झाली आहे. आखाती व इतर देशांमध्ये हापूसला मोठी मागणी आहे. यावर्षी हंगाम चांगला होईल, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Eat plenty of mangoes throughout the month; Income will increase, even the common man will be able to afford it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.