पर्यावरणपूरक बाप्पा दुबई, नायजेरियाला रवाना

By वैभव गायकर | Published: August 3, 2022 11:37 AM2022-08-03T11:37:24+5:302022-08-03T11:38:08+5:30

पनवेलच्या युसूफ मेहरअली सेंटरमध्ये तयार केल्या गणेशमूर्ती

Eco-friendly Bappa leaves for Dubai, Nigeria | पर्यावरणपूरक बाप्पा दुबई, नायजेरियाला रवाना

पर्यावरणपूरक बाप्पा दुबई, नायजेरियाला रवाना

googlenewsNext

- वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सव ओळखला जातो. मागील तीन वर्षात या सणावर कोरोनाचे सावट होते. मात्र यावर्षी शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने सणाचा उत्सव शिगेला पोहोचला आहे. युसूफ मेहरअली सेंटरमध्ये अशा विशेष गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यंदा या गणेशमूर्ती थेट दुबई आणि नायजेरियाला रवाना झाल्या आहेत.

देशाबाहेरील गणेशभक्त गणेशोत्सवानिमित्त मायदेशात येऊ शकत नसल्याने परदेशात आहे त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात. अशा ६८ भक्तांच्या मागणीनुसार सेंटरमधील गणेशमूर्ती थेट विमानातून दुबईला पाठविण्यात आल्या आहेत. तर नायजेरियात कामानिमित्त स्थायिक झालेल्या एका भक्ताच्या आग्रहाखातरदेखील एक गणेशमूर्ती पाठविण्यात आली आहे. पर्यावरणपूरक अशा या मूर्ती टेराकोटापासून बनविलेल्या असतात. ही मूर्ती घरच्या घरी तुळशी वृंदावन अथवा आपल्या बागेतदेखील विसर्जन करू शकतो. या मूर्तीत बियाणे टाकलेले असते, ज्यामधून नव्या रोपट्याची निर्मिती होऊ शकते अशी यामागची संकल्पना असल्याची युसूफ मेहरअली सेंटरच्या सामाजिक सेवा विभागाचे संतोष ठाकूर यांनी सांगितले. मूर्तिकार प्रकाश तांबे या मूर्ती घडवत असतात. 

मागील वर्षी कोरोनामुळे केवळ ५०० मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. ग्राहकांच्या मागणीनुसार यावर्षी हजारोंच्या संख्येने मूर्ती तयार करण्यात आल्या असून, यावर्षी चांगली मागणी ग्राहकांकडून होत आहे. ८ इंचापासून पुढे या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळात पर्यावरणपूरक मूर्तीची मागणी वाढली आहे. सेंटरमध्ये बनविलेल्या मूर्ती ग्राहकांच्या पसंतीला 
पडत आहेत.

Web Title: Eco-friendly Bappa leaves for Dubai, Nigeria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.