शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

पर्यावरणपूरक बाप्पा दुबई, नायजेरियाला रवाना

By वैभव गायकर | Published: August 03, 2022 11:37 AM

पनवेलच्या युसूफ मेहरअली सेंटरमध्ये तयार केल्या गणेशमूर्ती

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सव ओळखला जातो. मागील तीन वर्षात या सणावर कोरोनाचे सावट होते. मात्र यावर्षी शासनाने सर्व निर्बंध हटविल्याने सणाचा उत्सव शिगेला पोहोचला आहे. युसूफ मेहरअली सेंटरमध्ये अशा विशेष गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यंदा या गणेशमूर्ती थेट दुबई आणि नायजेरियाला रवाना झाल्या आहेत.

देशाबाहेरील गणेशभक्त गणेशोत्सवानिमित्त मायदेशात येऊ शकत नसल्याने परदेशात आहे त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात. अशा ६८ भक्तांच्या मागणीनुसार सेंटरमधील गणेशमूर्ती थेट विमानातून दुबईला पाठविण्यात आल्या आहेत. तर नायजेरियात कामानिमित्त स्थायिक झालेल्या एका भक्ताच्या आग्रहाखातरदेखील एक गणेशमूर्ती पाठविण्यात आली आहे. पर्यावरणपूरक अशा या मूर्ती टेराकोटापासून बनविलेल्या असतात. ही मूर्ती घरच्या घरी तुळशी वृंदावन अथवा आपल्या बागेतदेखील विसर्जन करू शकतो. या मूर्तीत बियाणे टाकलेले असते, ज्यामधून नव्या रोपट्याची निर्मिती होऊ शकते अशी यामागची संकल्पना असल्याची युसूफ मेहरअली सेंटरच्या सामाजिक सेवा विभागाचे संतोष ठाकूर यांनी सांगितले. मूर्तिकार प्रकाश तांबे या मूर्ती घडवत असतात. 

मागील वर्षी कोरोनामुळे केवळ ५०० मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. ग्राहकांच्या मागणीनुसार यावर्षी हजारोंच्या संख्येने मूर्ती तयार करण्यात आल्या असून, यावर्षी चांगली मागणी ग्राहकांकडून होत आहे. ८ इंचापासून पुढे या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळात पर्यावरणपूरक मूर्तीची मागणी वाढली आहे. सेंटरमध्ये बनविलेल्या मूर्ती ग्राहकांच्या पसंतीला पडत आहेत.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव