शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

नवी मुंबईत २० हजार ४७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, १५.८१ कोटी बॅंकेत जमा

By नारायण जाधव | Published: April 24, 2023 4:24 PM

या दोन वर्षांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी 33 कोटी 25 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.

 नवी मुंबई - येथील महानगरपालिकेच्या वतीने पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विविध घटकांतील 20 हजार 47 पात्र विद्यार्थ्यांना 2021-22 वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर केली असून 15 कोटी 81 लक्ष 20 हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नमुंमपा मुख्यालय शाखेत पाठविण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विविध घटकांतील इयत्ता पहिली ते महाविदयालयीन शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना सन 2021-22 व सन 2022-23 या वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या दोन वर्षांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी रु.33 कोटी 25 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे.

या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना जलद मिळावा यादृष्टीने समाजविकास विभागाने कार्यवाही करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली सुयोग्य नियोजन करण्यात आले. दोन वर्षांसाठी प्राप्त 71 हजारहून अधिक अर्जांची पडताळणी, छाननी हे काहीसे जिकरीचे काम विहित वेळेत करण्याच्या दृष्टीने समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी समाजसेवा अधिकारी सर्जेराव परांडे व इतर कर्मचा-यांच्या सहयोगाने कालबध्द आखणी केली व तिची काटेकोर अंमलबजावणी केली, त्यामुळेच 2021-22 ची 20 हजार 47 पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृ्त्ती वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी 2021-22 साठी 34,318 तसेच 2022-23 या वर्षासाठी 37,557 अशाप्रकारे दोन वर्षांसाठी एकूण 71,875 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या नोंदणीचा अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी 2023 होता. इतक्या मोठ्या संख्येने प्राप्त अर्जांतून पहिल्या टप्प्यात 31 मार्च 2023 पूर्वी सन 2021-22 ची शैक्षणिक शिष्यवृत्ती विदयार्थ्यांना विहीत मुदतीत देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले. याकरिता विभाग स्तरावर योजना प्रचार, प्रसाराचे काम करणा-या सर्व समुहसंघटक (Level-1 Verifier) यांना 1 मार्च पासून सेक्टर 11, बेलापूर भवन येथील समाजविकास विभागाच्या कार्यालयात संगणक, लॅपटॉप, नेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या व प्राप्त अर्ज प़डताळणी कामाला समुहसंघटक व इतर कर्मचा-यांमार्फत जोमाने सुरूवात करण्यात आली.

या सुरू असलेल्या कामावर दैनंदिन काटेकोर लक्ष ठेवण्यात आले.  त्याचीच परिणिती म्हणजे केवळ 15 दिवसात जलदगतीने अर्जांची छाननी करुन 2021-22 या वर्षासाठी 20,047 पात्र विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यात 15 कोटी 81 लाख 20 हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्याकरिता या पात्र लाभार्थ्यांची यादी व रक्कमेचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया, नमुंमपा मुख्यालय शाखा यांच्याकडे देण्यात येऊन लाभ वितरण प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.

2021-22 चे 390 प्रलंबित अर्ज दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांना परत पाठविण्यात आलेले असून या संदर्भात त्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात आलेले आहे. याशिवाय दुस-या टप्प्यातील सन 2022-23 या वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता प्राप्ता 37,557 विदयार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आलेली असून 21,675 अर्जांची  पडताळणी पूर्ण झालेली आहे. उर्वरित 15,882 अर्जांची छाननी 23 एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या उददिष्टानुसार 30 एप्रिलपर्यंत  2022-23 वर्षाचीही शैक्षणिक शिष्यवृत्ती पात्र विदयार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून त्यानुसार कालबध्द कार्यवाही सुरू असल्याची माहिती समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्रीराम पवार यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई