लोकमान्य टिकळ टर्मिनलमध्ये आठ दिवसांचा मेगा ब्लॉक
By कमलाकर कांबळे | Published: February 12, 2024 08:24 PM2024-02-12T20:24:34+5:302024-02-12T20:24:48+5:30
कोकण रेल्वेच्या आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
नवी मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनलमधील कोचिंग सुविधांचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनलमधून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
करमाळी-लोकमान्य टिळक (टी) (२२११६) एक्स्प्रेसचा १५ फेब्रुवारीला सुरू होणारा प्रवास ठाणे स्थानकावर स्थगित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तिरुवनंतपूरम सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) ( १६३४६) नेत्रावती एक्स्प्रेसचा १६ फेब्रुवारीला सुरू होणारा प्रवास पनवेल स्थानकावर अंशत: स्थगित केला जाणार आहे. मंगळुरु सेंट्रल - लोकमान्य टिळक (टी) (१२६२०) मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा १७ फेब्रुवारीला सुरू होणारा प्रवास पनवेल स्थानकावर कमी केला जाईल.
लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल ( १६३४५) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास १८ फेब्रुवारीला पनवेल स्थानकावरून दुपारी १:४० वाजता पुनर्नियोजित वेळेसह सुरू होईल. तसेच लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरु सेंट्रल ( १२६१९) मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास १८ फेब्रुवारीला पनवेल स्थानकावरून सायंकाळी ५:१० वाजता सुरू होईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.