नायजेरियनला घर देणारे आठ घरमालक रडारवर; उलवेत पोलिसांनी केली होती कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:40 AM2023-10-19T08:40:52+5:302023-10-19T08:41:02+5:30

ड्रग्ज विक्रीशी संबंधित असणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

Eight landlords on radar for housing Nigerians; Police had taken action in Ulve | नायजेरियनला घर देणारे आठ घरमालक रडारवर; उलवेत पोलिसांनी केली होती कारवाई

नायजेरियनला घर देणारे आठ घरमालक रडारवर; उलवेत पोलिसांनी केली होती कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उलवे येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमली पदार्थ बाळगणारे नायजेरियन आढळून आले होते. याप्रकरणी आठ घरमालकांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विदेशी नागरिक भाडोत्री ठेवताना त्यांनी पोलिसांना त्याची कल्पना दिली नव्हती. पुष्पा राठोड, किरण राठोड, चैथूबाई कोळी, बाळू गजगे, अशोक जानकर, आशिष धीर, अपर्णा गोंधळी व समीर दाऊद खान देशमुख, अशी त्यांची नावे आहेत. 

ड्रग्ज विक्रीशी संबंधित असणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. उलवे परिसरात राहणाऱ्या नायजेरियन व्यक्तींची ६ ऑक्टोबरला धरपकड करण्यात आली होती. 

या कारवाईत १४ नायजेरियन बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे आढळून आले होते, तर एकाकडे ८४ लाखांचे अमली पदार्थ आढळून आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी त्यांना आश्रय देणाऱ्या घरमालकांची चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये या नायजेरियन व्यक्तींना भाड्याने ठेवताना पोलिसांना कळवले नव्हते, अशी माहिती समोर आली.

विदेशी नागरिकांकडून अधिक प्रमाणात भाडे मिळत असल्याने अनेक जण पोलिसांना कल्पना न देता, भाडेकरार न करता, नायजेरियन व्यक्तींना आश्रय देतात. याचा फायदा घेऊन ते गुन्हेगारी कृत्ये करत असतात. उलवे परिसरातही १२ ठिकाणी हे नायजेरियन राहत असताना, संबंधित घरमालकांनी पोलिसांना त्याची कल्पना दिली नव्हती. 

Web Title: Eight landlords on radar for housing Nigerians; Police had taken action in Ulve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.