नेरळ : शहरातील राजेंद्रगुरूनगर येथील एका आठ वर्षीय बालकाचा ओहळात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. राजेंद्रगुरूनगर येथील बेस्ट कॉम्प्लेक्समध्ये आई व चार मुले असे कुटुंब राहत आहे. त्यांंना वडील नव्हते. चार भावांपैकी लहान मुलगा सरफुद्दीन बहुउद्दीन नक्षबंदी दुसरीत शिकत होता. मासे पकडण्याची आवड असल्याने तो गळ घेऊन मासे पकडण्यासाठी गेला होता. मात्र, तोल गेल्याने तो ओहळात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.साधारण ११ वाजताच्या सुमारास एका तरुणाला सरफुद्दीन पाण्यावर तरंगताना दिसला आणि हा सर्व प्रकार उघड झाला. त्याला बाहेर काढून खांडा येथील खासगी रु ग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक रु ग्णालयात नेण्यात आले.सरफुद्दीनच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील नाही आणि आई दोन्ही पायांनी अपंग आहे. घरी कोणी कमवत नसल्याने, आजूबाजूला राहणारेच लोक त्यांना आपापल्या परीने मदत करीत असल्याचे समोर आले आहे.
नेरळमध्ये आठ वर्षांचा मुलगा बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 5:39 AM