उरणमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त; नाकाबंदी, गस्तीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 10:06 PM2022-12-17T22:06:16+5:302022-12-17T22:07:14+5:30
अधिकाऱ्यांसह २०६ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या
मधुकर ठाकूर
उरण :उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी (१८)होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी (१८) मतदार होणार आहे.या मतदानाच्या पार्श्वभूमीवर उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १३ आणि न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चार ग्रामपंचायतीच्याच नव्हे तर उरण परिसरातील हद्दीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.खबरदारीची उपाययोजना म्हणून परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार नवीन शेवा,नवघर,कळंबुसरे
या तीन ठिकाणी फिक्स पाइंट तर ठिकठिकाणी नाकाबंदी, पेट्रोलियम करण्यात येत आहे.
तसेच मतदान आणि मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक -६, उपनिरीक्षक -२९ आणि कर्मचारी - १७६ असे एकूण २०६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"