परिवहन मंडळाच्या ‘बसला’ही इलेक्शन ड्युटी !

By admin | Published: February 22, 2017 06:49 AM2017-02-22T06:49:03+5:302017-02-22T06:49:03+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे, इतर साहित्य व कर्मचारी

Election board of 'Basla' | परिवहन मंडळाच्या ‘बसला’ही इलेक्शन ड्युटी !

परिवहन मंडळाच्या ‘बसला’ही इलेक्शन ड्युटी !

Next

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोली
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे, इतर साहित्य व कर्मचारी पोहोेचविण्याच्या कामावर सोमवारपासून मुंबई आणि रायगड विभागातून मोठ्या प्रमाणात एसटी सोडण्यात आल्या. निवडणूक यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात बस लागल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक कोलमडून गेली होती. बस थांब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे.
साहित्य आणि कर्मचारी मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्याकरिता पनवेलसह रायगड जिल्ह्यातील विविध आगारांतून मोठ्या प्रमाणात बसेस निवडणूक विभागाला उपलब्ध करून देण्यात आल्या. या गाड्या मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी शासकीय कार्यालय, तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी थांबवल्या होत्या. रायगडातील बहुतांश आगारातून ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या गाड्याच प्राधान्याने या सेवेसाठी दिल्या होत्या. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच ग्रामीण भागात एसटी गेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यासाठी तसेच इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत सहा आसनी व इतर वाहनांचा धंदा तेजीत दिसला.
एसटीबरोबरच खासगी स्कूल बसही निवडणुकीच्या कामावर लावल्या आहेत. त्यांचा परिणाम विद्यार्थी वाहतुकीवर काही प्रमाणात झाला. सर्वात जास्त झळ पनवेलकरांना सहन करावी लागली. पनवेल बस आगारातून एकूण २० बसेस निवडणुकीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. सोमवारी दिवसभर मतदान यंत्राबरोबर इतर साहित्य आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. त्याचबरोबर मंगळवारीही मतदान असल्याने या बसेस बाहेर सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे साहजिकच कल्याण, कुर्ला, दादर या ठिकाणच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय कल्याण, डोंबिवली, अलिबाग, उरण, कर्जत, श्रीवर्धन, पेण, मुरूड या आगारातील बसेस इलेक्शन ड्युटीला गेल्याने पनवेल मार्गावरील फेऱ्यांची संख्या घटली आहे.

Web Title: Election board of 'Basla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.