आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका, ८ डिसेंबरला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:15 PM2019-11-14T23:15:27+5:302019-11-14T23:15:36+5:30
आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका ८ डिसेंबर रोजी होणार आहेत.
पनवेल : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. कुंडेवहाळ, आपटा, वाकडी, चिखले, गव्हाण, वडघर, तरघर, उलवे या ग्रामपंचायतींसाठी ८ डिसेंबरला मतदान होत आहे. मतमोजणी ९ डिसेंबर रोजी आहे.
तालुक्यात पोटनिवडणूक होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर पनवेलमध्ये पुन्हा ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. कुंडेवहाळ-१, आपटा-१, वाकडी-१, चिखले-१, गव्हाण-४, वडघर-१, तरघर-१, उलवे-२, अशा जागांवर मतदान होत आहे. आठ ग्रामपंचायतींमधील १२ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ ते २१ नोव्हेंबर असून, २२ नोव्हेंबर रोजी छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख २५ नोव्हेंबर आहे. ९ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. ८ डिसेंबर रोजी पनवेल तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींत पोटनिवडणुका होणार आहेत.