निवडणूक प्रक्रिया कर्मचारी राहणार मतदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:51 AM2019-04-25T00:51:04+5:302019-04-25T00:51:26+5:30
फॉर्म नं.१२ बाबत माहिती उपलब्ध न झाल्याने संभ्रम
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या नवी मुंबईतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. या प्रक्रियेत काम करणाºया कर्मचाºयांसाठी विशेष सुविधा असलेल्या फॉर्म नंबर १२ चे वाटप करण्यात आले होते; परंतु याबाबत माहिती न मिळाल्याने फॉर्म भरून देण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल होती. ही मुदत संपली असून यामुळे संभ्रमात असलेले मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत.
ठाणे लोकसभा मतदारसंघात नवी मुंबई शहरातील बेलापूर आणि ऐरोली दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मतदान प्रकिया योग्य रीतीने पार पडावी, यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर शहरातील महापालिका, सिडको, पोलीस, एपीएमसी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, लिंक वर्कर आदी कर्मचाºयांची मदत घेतली जात आहे. नवी मुंबई शहरातील अनेक कर्मचाºयांची नियुक्ती शहराबाहेरील मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या कामासाठी कर्मचाºयांना आदेश देण्यात आले असून त्यांना नेमून दिलेल्या कामाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात ५५ इमारतींमध्ये ३८६ मतदान केंद्रे तर ऐरोली मतदारसंघात ७२ इमारतींमध्ये ४५२ मतदार केंद्रे तयार केली आहेत.
प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक विभाग आणि महापालिका यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम, पथनाट्य आदी कार्यक्रमाद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मतदार केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलीस अधिकारी असे सहा अधिकारी, तसेच पाच ते सहा मतदान केंद्रांसाठी एक झोनल अधिकारी असे अधिकारी नेमण्यात आले आहेत.
अधिकारी, कर्मचाºयांनाही अर्जाची जागृती व्हावी
बेलापूर विधानसभा क्षेत्रात २५00 आणि ऐरोली मतदारसंघात सुमारे २८00 अधिकारी आणि कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी फॉर्म नंबर १२ भरून घेतला जातो, त्यानंतर मतपत्रिका देण्यात येते. ही प्रक्रिया सात दिवस आधी करण्यात येते.
बेलापूर, ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कर्मचाºयांना आदेशाच्या प्रतीबरोबर फॉर्म नंबर १२चे वाटप करण्यात आले होते; परंतु या फॉर्मसंबंधी माहिती देण्यात आली नाही. अनेक कर्मचारी निवडणूक उपक्र मात पहिल्यांदाच सहभागी झाले आहेत, त्यामुळे माहिती नसल्याने फार्म भरले गेले नाहीत.
कर्मचाºयांना पहिल्याच मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आदेशामध्ये फॉर्म नंबर १२ चे वाटप करण्यात आले आहे, यामध्ये या फॉर्मबाबत माहिती देण्यात आली आहे. ते प्रत्येकाने वाचणे अपेक्षित आहे. फॉर्म जमा करून घेण्याची २२ एप्रिल ही अंतिम मुदत होती. फॉर्म भरून आल्यावर त्याला चिन्हांकित यादी करून पुढील कार्यवाही करावी लागते. जे फॉर्म आले होते त्याचे काम सुरू करण्यात आले असून मुदत संपल्याने आता कोणतेही नवीन फॉर्म घेता येणार नाहीत.
- अभय करगुटकर, निवडणूक निर्णय अधिकारी, ऐरोली