निवडणुकीतील आश्वासने पाळली जात नाहीत - वरुण गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:12 AM2018-08-09T05:12:28+5:302018-08-09T05:12:38+5:30
निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी अनेक आश्वासने देतात. केवळ मतदारांना खूश करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात अशी पोकळ आश्वासने दिली जातात.
नवी मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी अनेक आश्वासने देतात. केवळ मतदारांना खूश करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात अशी पोकळ आश्वासने दिली जातात. शहरीभागातील मतदारांना त्यातील ही पोकळ आश्वासने कळतात; परंतु ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांचा मात्र त्यावर विश्वास बसत असल्याने, असे राजकारणी निवडणुकीत बाजी मारतात, अशी खंत खासदार वरुण गांधी यांनी व्यक्त केली आहे.
नेरुळ येथे डॉ. डी. वाय. पाटील सभागृहात बुधवारी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार
वरुण गांधी या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. खा. गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्र माला सुरु वात झाली. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्रमुख डॉ. विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. शिवानी पाटील आदी उपस्थित होते.