पनवेल मधील अधिकारी,कर्मचारी यांना निवडणुकीचे प्रशिक्षण;पहिल्या टप्प्यात १४०० कर्मचारी  

By वैभव गायकर | Published: April 13, 2024 02:41 PM2024-04-13T14:41:12+5:302024-04-13T14:42:44+5:30

चार सत्रात पार पडलेले हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ शेडूंग येथे पार पडले.      

election training to employees in panvel 400 employees attend in first phase | पनवेल मधील अधिकारी,कर्मचारी यांना निवडणुकीचे प्रशिक्षण;पहिल्या टप्प्यात १४०० कर्मचारी  

पनवेल मधील अधिकारी,कर्मचारी यांना निवडणुकीचे प्रशिक्षण;पहिल्या टप्प्यात १४०० कर्मचारी  

वैभव गायकर पनवेल: जिल्हाध‍िकारी व जिल्हा निवडणूक अध‍िकारी रायगड किसन जावळे यांच्या आदेशानुसार ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाच्या १८८ पनवेल  विधानसभा मतदारसंघामधील २७५९ पैकी १४००  मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  प्रशिक्षण पहिल्या टप्प्यात दि.१२ व १३ दरम्यान पार पडले. चार सत्रात पार पडलेले हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ शेडूंग येथे पार पडले.      

ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण व ईव्हीएम हँण्डस् ऑन ट्रेनिंग या स्वरूपाचे हे ट्रेनिंग आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या  उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी पनवेल तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कर्तव्याबाबत व ईव्हीएम मशिन बाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके  यांनी  ईव्हीएम मशिन हाताळणी ,मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य तसेच कामकाजाबाबत सोप्या भाषेत माहिती दिली. निवडणूक क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर्स यांनी काम पाहिले तर व्यवस्थापक म्हणून तहसीलदार पनवेल विजय पाटील व त्यांचे सर्व सहकारी नायब तहसिलदार यांनी कामकाज सांभाळले.

Web Title: election training to employees in panvel 400 employees attend in first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.