रेल्वे रुळावर विजेचा खांब
By admin | Published: February 9, 2017 05:33 AM2017-02-09T05:33:07+5:302017-02-09T05:33:07+5:30
रेल्वे रुळावर मोठा लोखंडी तुकडा अथवा विजेचा खांब ठेवून घातपात करण्याचा मोठा डाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पनवेल : रेल्वे रुळावर मोठा लोखंडी तुकडा अथवा विजेचा खांब ठेवून घातपात करण्याचा मोठा डाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
८ फे ब्रुवारीलापहाटे चार वाजता पनवेलवरून उरणला जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या रु ळावर कोपर येथे मोठा विजेचा खांब आडवा ठेवल्याने अचानक रेल्वेचा वेग मंदावला. या वेळी चालकाने खाली उतरून
पाहिले असता, मोठा विजेचा खांब हा रु ळावर ठेवल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांनी त्वरित पोलिसांना याबाबत कळविले.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच कळंबोली या ठिकाणी अशीच घटना घडली होती. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनेमागे घातपात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
दहशतवादी रेल्वेच्या आडून एखादी घटना घडवून आणू शकतात, असा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी सरकारला दिला होता. एकाच प्रकारच्या सारख्याच घटना वारंवार घडत असतील, तर यामागे कोणत्या प्रवृत्ती आहेत हे शोधण्याचे नवीन आव्हान पोलिसांसमोर तयार झाले आहे.
थेट रेल्वेला टार्गेट केले जात असल्याचे या घटनांमधून उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वे सुरक्षेबाबत सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)