नवी मुंबई - महावितरणच्या भांडूप परिमंडळातील पेण, ठाणे व वाशी मंडळात विविध वर्गवारीतील उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची एकूण थकबाकी ३११ कोटींची आहे. यामध्ये, चालू बिल जोडल्यास सदर थकबाकी ६७५ कोटींच्या घरात आहे. वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी थकबाकी न भरल्याने कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार १ नोव्हेंबरपासून ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे.
भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी परिमंडलांतर्गत सर्व कार्यालयांना धडक कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले असून, आतापर्यंत ६,४७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
n मुख्य अभियंता औंढेकर म्हणाले की, महावितरण ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असते. n आपल्या जीवाची परवा न करता महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी झटत असतात. n ग्राहकांना वारंवार विनंती करून थकबाकीदार ग्राहक वीज बिल भरत नाही. आर्थिक परिस्थिती बघता नाइलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे.
कुठे भरू शकता बिल?सध्या महावितरणचे कॅश कलेक्शन सेंटर शनिवार व रविवारीसुद्धा चालू ठेवले आहेत. याशिवाय, महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा महावितरण मोबाइल ॲपद्वारेही वीज बिल भरता येते.
वीजपुरवठा खंडित ग्राहकठाणे मंडळ १,८१५ वाशी मंडळ ३,०८७पेण मंडळ १,५७२