- योगेश पिंगळे नवी मुंबई : एकविसाव्या शतकातील सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात अंत्यविधी करण्यासाठी फक्त लाकडांचा पर्याय उपलब्ध असल्याने शहरात प्रदूषणाबरोबर पर्यावरणाची देखील हानी होत आहे. शहरात पालिकेच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लाखो रु पये खर्च करून करावे, तुर्भे आणि नेरु ळ या भागात विद्युत, डिझेल, गॅसदाहिनी सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु नागरिकांमध्ये जनजागृती न झाल्याने त्यांचा वापर झाला नाही आणि काही काळातच पर्यावरणपूरक अत्याधुनिक दाहिन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यविधी करण्याची इच्छा असूनही नागरिकांना शहरात अन्य पर्याय उपलब्ध नाही.शहरामध्ये तुर्भे येथे डिझेल, नेरु ळ येथे गॅस, तर करावे येथे पर्यावरणपूरक विद्युतदाहिनीची निर्मिती करण्यात आली होती, यामध्ये महापालिकेच्या आणि खासगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता; परंतु या दाहिनींची पालिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती झाली नाही, तसेच त्याचे महत्त्वदेखील पटवून देण्यात आले नाही, त्यामुळे या पर्यावरणपूरक दाहिनी वापराविना कालांतराने बंद पडल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यासाठी आजही फक्त पारंपरिक पद्धतीने लाकडांचा पर्याय उपलब्ध आहे. अंत्यविधीसाठी १०० टक्के लाकडांचा वापर होत असल्याने, तसेच पर्यावरणपूरक अंत्यविधी करण्याची इच्छा असूनही पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करावे लागत आहेत. नवी मुंबई शहरात राहणाºया नागरिकांचा पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यविधी करावयाचा असल्यास पालिकेच्या माध्यमातून अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, मीठ, गोवºया, रॉकेल आदी साहित्य पुरविण्यात येते. पारंपरिक पद्धतीने लाकडाचा वापर करून अंत्यविधी करण्याची नागरिकांची मानसिकता असली तरी शहरांमध्ये राहणाºया नागरिकांमध्ये काळानुरूप झालेल्या विचारांच्या बदलानुसार प्रदूषण विरहित अंत्यविधी करण्याची मानसिकता येत चालली आहे; परंतु २१ व्या शतकातील स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा डंका पिटणाºया सुनियोजित शहरात अंत्यविधीसाठी अत्याधुनिक यंत्रणेचा पर्याय उपलब्ध नसल्याने, मानसिकता असूनदेखील पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करावा लागत आहे. शहरात राहणारे पर्यावरणप्रेमी नागरिकांना पर्यावरणपूरक अंत्यविधी करण्यासाठी मुंबई सारख्या शहरात जावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार शहरात महिन्याला सरासरी ३०० नागरिकांचा अंत्यविधी पालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये केला जातो. यासाठी दीड हजार टन लाकूड जाळण्यात येत आहे. तसेच यासाठी महिन्याला सरासरी दहा लाख रु पयांहून अधिक खर्च केला जात आहे. महापालिकेने शहरातील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी अत्याधुनिक यंत्रणा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.करावेमधील विद्युतदाहिनी पुन्हा सुरू होणारनागरिकांना अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेच्या करावे येथील बंद पडलेली विद्युतदाहिनी वाहिनी नवी मुंबई चॅरिटेबल फाउंडेशन ही संस्था पुन्हा सुरू करणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून एक वर्षे या विद्युतदाहिनीची देखभाल दुरुस्तीही केली जाणार आहे.नवी मुंबई शहरात नागरिकांना विविध सुविधा देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून विविध अत्याधुनिक उपक्र म राबविले आहेत.काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या उपक्रमात कचºयाचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावणाºया नवी मुंबई शहराला घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून नामांकन प्राप्त झाले आहे.शहराचे नावलौकिक वाढविण्यासाठी शहरात अनेक उपक्र म राबविणाºया महापालिकेने पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी, तसेच वृक्षसंवर्धनासाठी पर्यावरणपूरक दाहिनी बांधल्या होत्या.पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी पर्यावरणपूरक यंत्रणा बसविण्यात आल्या होत्या; परंतु या यंत्रणा सुरू राहण्यासाठी आवश्यक तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने त्या बंद पडल्या आहेत. नागरिकांची काही प्रमाणात मागणी असल्याने येत्या काही महिन्यांत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरातील मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनी सुरू करण्यात येणार आहेत.- मोहन डगावकर,शहर अभियंता
शहरातील विद्युत, डिझेल दाहिन्या धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 4:39 AM