पनवेल विभागामध्ये विद्युत मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:11 PM2019-05-21T23:11:44+5:302019-05-21T23:12:20+5:30

ग्राहकांना वाढीव बिलाचा भुर्दंड : मीटर बदलून देण्यास महावितरणकडून चालढकल; शहरवासीयांची नाराजी

Electricity meter scarcity in Panvel division | पनवेल विभागामध्ये विद्युत मीटरचा तुटवडा

पनवेल विभागामध्ये विद्युत मीटरचा तुटवडा

googlenewsNext

कळंबोली : पनवेल परिसरात नादुरुस्त विद्युत मीटरच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या नादुरुस्त विद्युत मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठविली जातात. हे मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज केले आहेत; परंतु महावितरणच्या पनवेल कार्यालयात नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे.


महावितरणच्या पनवेल मंडळात सिडको वसाहती, पनवेल शहर त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि उरणचा समावेश आहे. या ठिकाणी लाखो वीजग्राहक आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामध्ये व्यावसायिक, घरगुती आणि औद्योगिक प्रकारच्या वीजजोडण्या आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत पनवेल परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटले आहे; परंतु अनेक ग्राहकांना वाढीव देयके येत असल्याच्या तक्रारी आहेत.


कामोठे वसाहतीतील रहिवाशांच्या या संदर्भात अधिक तक्रारी आहेत. या विभागातील ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानाला ६३ हजार रुपयांचे देयके पाठविल्याची उदाहरणे आहेत. हे प्रतिनिधिक उदाहरण असले, तरी या क्षेत्रात अनेकांना विजेच्या वापरापेक्षा अधिक देयके पाठविली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नियमित विद्युत मीटरची रिडिंग न घेणे, सरासरी देयके पाठविणे आदीमुळे वाढीव देयके पाठविली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.


विशेष म्हणजे, शहरात विद्युत मीटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेही ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. नादुरुस्त मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज केले आहेत; परंतु महावितरणकडे नवीन विद्युत मीटरच नसल्याने याचा फटका ग्राहकांना बसत आहे, त्यामुळे महावितरणच्या अडचणीसुद्धा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करून मागणीनुसार नवीन विद्युत मीटर बदलून मिळावेत, 

 

ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन मीटर उपलब्ध आहेत. विशेषत: सिंगल फेजच्या मीटरचा पुरेसा साठा आहे; परंतु थ्री फेज आणि नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी पुरेसे मीटर नाहीत. त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.
- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, महावितरण अशी मागणी पनवेल विभागातील ग्राहकांनी केली आहे. 


बिघाड झालेल्या मीटरमुळे जास्त किंवा कमी रिडिंग येते, त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या रिडिंग प्रमाणे वीजबिल पाठवले जात नाही. या कारणाने ग्राहकांची चूक नसतानाही त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. अवास्तव वीजबिल आल्याने महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.
- आनंद भंडारी, वीजग्राहक, नवीन पनवेल

Web Title: Electricity meter scarcity in Panvel division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.