शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पनवेल विभागामध्ये विद्युत मीटरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:11 PM

ग्राहकांना वाढीव बिलाचा भुर्दंड : मीटर बदलून देण्यास महावितरणकडून चालढकल; शहरवासीयांची नाराजी

कळंबोली : पनवेल परिसरात नादुरुस्त विद्युत मीटरच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या नादुरुस्त विद्युत मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठविली जातात. हे मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज केले आहेत; परंतु महावितरणच्या पनवेल कार्यालयात नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या पनवेल मंडळात सिडको वसाहती, पनवेल शहर त्याचबरोबर ग्रामीण भाग आणि उरणचा समावेश आहे. या ठिकाणी लाखो वीजग्राहक आहेत. दररोज त्यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामध्ये व्यावसायिक, घरगुती आणि औद्योगिक प्रकारच्या वीजजोडण्या आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत पनवेल परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटले आहे; परंतु अनेक ग्राहकांना वाढीव देयके येत असल्याच्या तक्रारी आहेत.

कामोठे वसाहतीतील रहिवाशांच्या या संदर्भात अधिक तक्रारी आहेत. या विभागातील ३०० ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानाला ६३ हजार रुपयांचे देयके पाठविल्याची उदाहरणे आहेत. हे प्रतिनिधिक उदाहरण असले, तरी या क्षेत्रात अनेकांना विजेच्या वापरापेक्षा अधिक देयके पाठविली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नियमित विद्युत मीटरची रिडिंग न घेणे, सरासरी देयके पाठविणे आदीमुळे वाढीव देयके पाठविली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, शहरात विद्युत मीटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेही ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. नादुरुस्त मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे अर्ज केले आहेत; परंतु महावितरणकडे नवीन विद्युत मीटरच नसल्याने याचा फटका ग्राहकांना बसत आहे, त्यामुळे महावितरणच्या अडचणीसुद्धा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करून मागणीनुसार नवीन विद्युत मीटर बदलून मिळावेत, 

 

ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन मीटर उपलब्ध आहेत. विशेषत: सिंगल फेजच्या मीटरचा पुरेसा साठा आहे; परंतु थ्री फेज आणि नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी पुरेसे मीटर नाहीत. त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, महावितरण अशी मागणी पनवेल विभागातील ग्राहकांनी केली आहे. 

बिघाड झालेल्या मीटरमुळे जास्त किंवा कमी रिडिंग येते, त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या रिडिंग प्रमाणे वीजबिल पाठवले जात नाही. या कारणाने ग्राहकांची चूक नसतानाही त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. अवास्तव वीजबिल आल्याने महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात.- आनंद भंडारी, वीजग्राहक, नवीन पनवेल