पाळीव कुत्र्याला गारेगार ठेवण्यासाठी श्रीमंताकडून वीजचोरी; महावितरणची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:06 PM2020-03-06T22:06:10+5:302020-03-06T22:13:24+5:30

पाळीव कुत्र्यासाठी २४ तास वातानुकूलित यंत्रणा वापराने आले अंगलट, जागरूक नागरिकांनी दिली वीजचोरीची टीप

Electricity robbed to keep domestic dogs in air condition The collision action of Mahavitaran pda | पाळीव कुत्र्याला गारेगार ठेवण्यासाठी श्रीमंताकडून वीजचोरी; महावितरणची कारवाई

पाळीव कुत्र्याला गारेगार ठेवण्यासाठी श्रीमंताकडून वीजचोरी; महावितरणची कारवाई

Next
ठळक मुद्देया वीजग्राहकांच्या घरात विविध प्रकारचे विदेशी जातीचे कुत्रे आहेत.  पाळीव प्राण्यांसाठी उच्चभ्रु वस्तीत वीज चोरी केल्याची ही दुर्मिळ घटना उघडकीस आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

नवी मुंबई - महावितणच्या नेरूळ विभागाने एका उच्चभ्रु लोकवस्तीतील घरगुती ग्राहकाकडे वीजचोरी पकडली. नेरुळ सेक्टर एकच्या ट्वीनलँड टॉवरमधील या ग्राहकाच्या घरातील एअर कंडीशनसाठी  जवळपास सात लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबातची टीप एका जागरूक ग्राहकाने भांडुप नागरी परिमंडळाच्या कार्यालयास दिल्यानंतर वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सिहांजीराव गायकवाड व पामबीचउपविभाग टीमने ही कारवाई केली. 

या वीजग्राहकांच्या घरात विविध प्रकारचे विदेशी जातीचे कुत्रे आहेत. या कुत्र्यांना २४ तास वातानुकूलित यंत्रणा लागत असल्याने सदर वीज चोरी केल्याचे ग्राहकाने कबुल केले आहे. या ग्राहकावर विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार  कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकाने एकूण ३४४६५ युनिट वीज चोरी करून महावितरण कंपनीचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान केले आहे. सदरची रक्कम ग्राहकाने दंडासह भरणा केली आहे.



 पाळीव प्राण्यांसाठी उच्चभ्रु वस्तीत वीज चोरी केल्याची ही दुर्मिळ घटना उघडकीस आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच ग्राहक वीजचोरी बाबत जागरूक झाल्याचेही या घटनेतून समोर आले आहे. ग्राहकांनी वीज चोरी केल्यास येथून पुढेही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच जागरूक ग्राहकांनी वीजचोरी बाबत महावितरण प्रशासनास माहिती द्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता सिहांजीराव गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Electricity robbed to keep domestic dogs in air condition The collision action of Mahavitaran pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.