तुर्भे येथे वीजचोरांचे धाबे दणाणले, चोरीत पकडलेल्या ग्राहकांनी भरले ६.२९ लाख रुपये

By नारायण जाधव | Published: October 10, 2022 05:01 PM2022-10-10T17:01:16+5:302022-10-10T17:04:40+5:30

तुर्भे मॅफ्को शाखेअंतर्गत वीजचोरी करणाऱ्यांवर छापे टाकून नुकतीच कारवाई करण्यात आली. एकूण आठ जणांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली. 

Electricity thieves in Turbhe, customers caught stealing pay Rs 6.29 lakh | तुर्भे येथे वीजचोरांचे धाबे दणाणले, चोरीत पकडलेल्या ग्राहकांनी भरले ६.२९ लाख रुपये

तुर्भे येथे वीजचोरांचे धाबे दणाणले, चोरीत पकडलेल्या ग्राहकांनी भरले ६.२९ लाख रुपये

Next

नवी मुंबई - महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची कारवाई सतत सुरू असते. असाच एका कारवाईत तुर्भे येथील सेक्टर २२ मध्ये एकूण ६.२९ लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे. तुर्भे मॅफ्को शाखेअंतर्गत वीजचोरी करणाऱ्यांवर छापे टाकून नुकतीच कारवाई करण्यात आली. एकूण आठ जणांवर वीजचोरीची कारवाई करण्यात आली. 

वीज अधिनियम २००३ कलम १३५ अन्वये सात वीजग्राहकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी चार ग्राहकांनी वीजचोरीचे ६२९५१०/- रूपयांचे दंडाचे  देयक भरले. उर्वरित तीन ग्राहकांवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वीज अधिनियम २००३ कलम १२६ अन्वये एक ग्राहकांवर कार्यवाही करण्यात आली. सदर वीजचोरी शोध मोहिमेकरिता अधीक्षक अभियंता राजाराम माने व कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे तसेच रवींद्र जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संजय मुंढे, पवन राऊत, सचिन फुलझले, जयेश गायकर, श्रद्धा भोजकर व कर्मचारी निकिता आगरकर, विशाल गिरी, विशाल चव्हाण यांनी कारवाई केली.

ग्राहकांनी अधिकृतपणे वीज वापर करावे व वापरलेल्या विजेचे बिल नियमितपणे भरावे. चोरीची वीज वापर आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
 

Web Title: Electricity thieves in Turbhe, customers caught stealing pay Rs 6.29 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.