जागतिक पर्यटन दिनानिमित्त एलिफंटा बेटावर स्वच्छता अभियान: एक टन कचऱ्याची विल्हेवाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 04:34 PM2023-09-27T16:34:17+5:302023-09-27T16:34:32+5:30
बेटावरील समुद्र किनारा व परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात १५० स्वच्छता दूत सहभागी झाले होते
मधुकर ठाकूर
उरण : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून आणि " स्वच्छता हिच सेवा " या अभियान अंतर्गत भारतीय पर्यटन विभाग, महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग आणि ग्रामपंचायत घारापुरी यांचे संयुक्त विद्यमाने बुधवारी ( २७) घारापुरी बेटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
बेटावरील समुद्र किनारा व परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात १५० स्वच्छता दूत सहभागी झाले होते.या स्वच्छता अभियानातुन सुमारे एक टन कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक , प्लास्टिक बॉटल्स आणि अन्य कचऱ्याचा समावेश होता.या स्वच्छता अभियानात घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्य तसेच भारतीय पर्यटन विभाग, महाराष्ट् पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.