विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मितीवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:19 AM2020-08-08T01:19:15+5:302020-08-08T01:19:25+5:30
आयुक्तांचे निर्देश : पोलीस अधिकाऱ्यांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
नवी मुंबई : श्रीगणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. मूर्तीची उंची कमी ठेवावी. सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांना दिल्या आहेत. शहरात कृत्रिम तलाव निर्मितीवर भर देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने निर्विघ्नपणे उत्सव साजरा होण्याकरिता नियोजन केले आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्यासह गणेशोत्सव आयोजन पूर्वतयारी बैठक घेऊन आठही विभाग अधिकारी यांच्याशी बेवसंवाद साधला.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये या वर्षीच्या गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. श्रीगणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीतकमी व्यक्ती येतील हे पाहावे. तशा प्रकारच्या सूचना गणेशमूर्ती विक्रेत्यांना देऊन याकडे काटेकोर लक्ष द्यावे, असे बांगर म्हणाले.
सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित विभागाचे सहायक आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने विभागातील संभाव्य जागांचे सर्वेक्षण करावे. तत्परतेने कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्या
च्कृत्रिम तलाव निर्मितीसाठी काही स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे पुढाकार घेत असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे सांगत अशा संस्था, मंडळे यांना प्रोत्साहित व सहकार्य करावे, असे सर्व विभागांच्या सह.आयुक्तांना आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. या तलावांची निर्मिती ही श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी व्हावी, असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
च्नवी मुंबई पालिका क्षेत्रातील २३ मुख्य विसर्जन स्थळांशेजारी कृत्रिम तलाव निर्माण करा. दरवर्षीप्रमाणे सर्व सुयोग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्यामध्ये निर्माल्याचे ओले व सुके असे संकलन करणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे, हार व पूजा साहित्य पाण्यात टाकले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.