कळंबोलीतील सिडको वसाहतीत खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:05 AM2019-07-29T02:05:51+5:302019-07-29T02:06:11+5:30

वाहनचालकांचे कंबरडे मोडले : पावसाच्या धडाकेबाज बॅटिंगमुळे सखल भाग पाण्यात; रस्त्यांची चाळण

The Empire of the Pits in the Cidco Colony of Kalamboli | कळंबोलीतील सिडको वसाहतीत खड्ड्यांचे साम्राज्य

कळंबोलीतील सिडको वसाहतीत खड्ड्यांचे साम्राज्य

Next

कळंबोली : पनवेल महापालिका परिसर तसेच सिडको वसाहतीतील रस्त्यांची पावसामुळे दैनावस्था झाली आहे. पावसाच्या धडकेबाज बॅटिंगमुळे सखल भागातील पाणी साचलेल्या रस्त्यांचे डांबर वाहून गेले आहे. त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून खडी रस्त्यावर आली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही अनेक भागांत चाळण झाली आहे. यामुळे चालकांचे कंबरडे मोडले आहे.

पनवेल परिसरात सलग चार दिवस दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात तसेच सिडको वसाहतीत सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नाले सफाई फोल ठरल्याने पाणी निचरा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. शनिवार संध्याकाळनंतर पावसाने काहीशी उसंत घेतल्याने वसाहतीतील पाणी पूर्णपणे ओसरले. परंतू रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने सर्वत्र खडी पसरली आहे. कामोठे , कळंबोली , नवीन पनवेल , करंजाडे या परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. कळंबोली शिवसेना शाखेसमोर खड्डे पडले आहेत. सेक्टर ४ येथील पंपहाऊस रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. सेक्टर १४ येथील रस्त्यावरील डांबर नाहीसे झाले आहे. कामोठे येथील दुधे कॉर्नर जवळ मोठा खड्डा पडला आहे. नवीन पनवेल येथील सेक्टर ७ सेंट जोसेफ शाळेसमोरील रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. एचडीएफसी सर्कल येथील उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी होते. करंजाडे सेक्टर ४, ५ येथील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सेक्टर १३ येथे रविवारी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमल आदींनी पाहणी करून रहिवाशांच्या समस्यातून जाणून घेतल्या

सिडको अधिकारी फिरकलेच नाहीत
च्चार दिवस पावसाचा जोर कायम असल्याने सिडको वसाहतीत पाणी साचले होते. याबाबत आढावा घेण्याकरिता सिडको अधिकारी रविवारी फिरकलेसुद्धा नाहीत.
च्चौथा शनिवार, तसेच रविवार सुट्टी असल्याने सिडको अधिकाऱ्यांचे फावले.
च्वसाहतीतील रहिवाशी आधीच समस्यांनी त्रस्त आहेत. सिडको अधिकाऱ्यांना मात्र त्याचे देणेघेणे नसल्याचे कळंबोलीतील रहिवाशी आत्माराम कदम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

Web Title: The Empire of the Pits in the Cidco Colony of Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.