शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अथर्वने बुडविला कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी

By admin | Published: March 28, 2017 6:24 AM

सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी मुंबई : सिडकोमध्ये मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका घेतलेल्या अथर्व एजन्सीने २४९ कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एजन्सीचालकांनी भविष्यनिर्वाह निधी व्यवस्थापनाकडे तशी कबुली दिली असून, पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे; पण वास्तविक हा कष्टकरी कामगारांच्या पैशाचा अपहार असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अथर्व एजन्सीच्या अनागोंदी कारभाराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. सिडकोचे कार्यक्षेत्र वाढू लागल्याने व त्याप्रमाणात कर्मचारी नसल्याने जवळपास २०१० पासून बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती केली जात आहे. खारघरमध्ये अथर्व एजन्सीला निविदा न काढताच हा ठेका दिला होता; पण याविषयी अनेकांनी आवाज उठविल्यानंतर निविदा काढून पुन्हा त्याच एजन्सीला काम देण्यात आले. निविदा काढण्यापूर्वी दोन ते तीन वर्षे व निविदा काढल्यानंतर तीन वर्षे अथर्वच्या माध्यमातून कर्मचारी भरती करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेत भरणे, ही ठेकेदाराची जबाबदारी होती; पण प्रत्यक्षात ही रक्कम कधीच भरण्यात आली नाही. सानपाडामधील माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी याविषयी तक्रार केल्यानंतर सिडकोने त्या एजन्सीला मुदतवाढ दिली नाही. त्यांच्याऐवजी दुसरी एजन्सी नेमली आहे; पण पहिल्या एजन्सीने कामगारांचे थकविलेले पैसे न देता, त्याचा अपहार केल्याविषयी मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. एजन्सीला दिलेली रक्कम व त्यांनी त्याचा योग्य वापर केला आहे का? भविष्यनिर्वाह निधीचे पैसे भरलेले नसताना त्यांना बिले कशी अदा करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ठेकेदाराने किती कामगारांचे पैसे भविष्यनिर्वाह निधीमध्ये भरले आहेत, याविषयी माहिती घेण्यासाठी सुरेश मढवी यांनी माहिती अधिकाराचा वापर केला होता. यामधून कोणाचेही पैसे भरले नसल्याचे समोर आले आहे. मढवी यांनी तक्रारी सुरू केल्यानंतर या कार्यालयाने सिडकोला पत्र पाठवून माहिती मागविली होती. यानंतर अथर्वच्या चालकांनी २४ फेब्रुवारीला शपथपत्र दाखल केले आहे. २४९ कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. अभय योजनेअंतर्गत त्यांनी हा अर्ज केला आहे; पण वास्तविक कर्मचाऱ्यांचा हा आकडा बरोबर आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय तीन वर्षांचा भविष्यनिर्वाह निधी भरण्याची तयारी दर्शविली; पण काही कर्मचारी २०१० पासून कार्यरत होते. त्यांच्या पैशांचे काय? असेही मढवी यांनी विचारले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अथर्वच्या कामाची सखोल चौकशी केली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे सर्व पैसे मिळाले पाहिजेतच, त्याबरोबर ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. - सुरेश मढवी, सामाजिक कार्यकर्ते