कर्मचाऱ्यांचा प्रश्न महिन्यानंतरही अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:54 PM2020-02-27T23:54:05+5:302020-02-27T23:54:14+5:30
पनवेल महापालिकेतील समावेशन प्रलंबित
पनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पालिकेत समावेशनाच्या मागणीसाठी २२ जानेवारी रोजी कुटुंबीयांसह मंत्रालयावर लॉग मार्च काढला होता. सर्वपक्षीय नेत्यांनी या कर्मचाºयांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आंदोलनात मध्यस्ती करीत, महिनाभरात या कर्मचाºयांचे पालिकेत समावेशन केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, महिनाभराचा कालावधी लोटला तरी कर्मचाºयांच्या समावेशनाचा प्रश्न अंधातरीच आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच सुमारे तीन वर्षांपासून महापालिकेत समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीतील ३२० कर्मचाºयांच्या समवेशनाचा विषय प्रलंबित आहे. म्युनिसिपल एम्पलॉइज युनियन या कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले होते. या वेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कर्मचाºयांचे शिष्टमंडळ, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासमवेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेतली होती. बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाºयांच्या समावेशनाबाबत अनुकूलता दाखविली होती. या वेळी कर्मचाºयांचा लॉग मार्च नवी मुंबई, सानपाडा येथे थांबविण्यात आला होता. नगरविकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी यापूर्वी ३२० कर्मचाºयांपैकी पहिल्या टप्प्यात १४६ कर्मचाºयांच्या समावेशनाला २अनुकूलता दाखविली होती. मात्र, कामगार संघटना सर्वच्या सर्व ३२० कर्मचाºयांच्या समावेशनाबाबत ठाम भूमिका घेतली.
दोन-तीन दिवसांपूर्वी मंत्रालयात जाऊन यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. या कर्मचाºयांच्या समावेशनाची प्रक्रिया सुरू आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यादेखील स्वत: पाठपुरावा करीत आहेत. लवकरच महापालिकेतील समाविष्ट पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाºयांचा समावेशनाचा प्रश्न मार्गी लागेल.
- प्रीतम म्हात्रे,
विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका