महापालिका कर्मचारी आक्रमक

By admin | Published: August 13, 2015 11:33 PM2015-08-13T23:33:08+5:302015-08-13T23:33:08+5:30

महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी व अधिकारी महासंघ आक्रमक झाला आहे. १३ मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे

Employer of the municipal staff | महापालिका कर्मचारी आक्रमक

महापालिका कर्मचारी आक्रमक

Next

नवी मुंबई : महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी व अधिकारी महासंघ आक्रमक झाला आहे. १३ मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे. मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी २० आॅगस्टला पालिका मुख्यालयामध्ये बैठक होणार आहे.
पालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सरकारी निर्णयाप्रमाणे महासभेच्या मान्यतेनुसार वैद्यकीय खर्चाच्या देयक देण्याबाबत कार्यवाही करण्यात
यावी, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कल्याण निधीविषयी त्वरित निर्णय घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान देण्यात यावे, लिपिक, टंकलेखक, माहिती नोंदणीकार, वरिष्ठ लिपिक, करनिरीक्षक व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती तत्काळ करण्यात यावी. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीमधील अनुशेष त्वरित भरण्यात यावा. १२ ते १४ वर्षे कार्यरत असलेल्या परंतु अद्यापपर्यंत पदोन्नतीची संधी उपलब्ध न झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. एकाच विभागाकडे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या सर्वच संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात अशा मागण्या आहेत.
महापालिका कर्मचाऱ्यांना गृहकर्ज, वाहन कर्ज, सण अग्रिमाच्या मर्यादा वाढविणे, सदनिका नूतनीकरण, दुरुस्ती यासाठी पाच लाख रुपयांपर्यंत अग्रीम मंजूर करण्यात यावे.
मुख्यालयात प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था करण्यात यावी. पालिकेच्या उपाहारगृहामध्ये सवलतीच्या दरात भोजन व इतर खाद्यपदार्थ मिळावेत, अशा मागण्या नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी महासंघाने केल्या आहेत. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी २० आॅगस्टला पालिका मुख्यालयामध्ये सर्व कामगारांच्या बैठकीचे
आयोजन केल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Employer of the municipal staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.