अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:14 AM2021-03-13T00:14:00+5:302021-03-13T00:14:21+5:30

महापालिका आयुक्तांचे निर्देश ; मालमत्ता कर वसुलीच्या उद्दिष्टासाठी ॲक्शन प्लॅन

Encourage arrears to avail Abhay Yojana | अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करा

अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना प्रोत्साहित करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर नागरिकांना १५ मार्चपर्यंत ७५ टक्के सूट मिळणार आहे. यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिल्याने थकबाकीदारांपर्यंत पुन्हा प्रभावीपणे या संधीचा लाभ घेण्याविषयी विविध माध्यमांतून माहिती पोहोचविण्यात यावी अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. 

सन २०२०-२१ करिता मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ६२५ कोटी आहे हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने ३१ मार्चपर्यंत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक गांभीर्याने काम करावे असे मालमत्ता कर विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी निर्देश दिले. अभय योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या दंडात्मक रकमेवर १६ मार्चनंतर ३१ मार्चपर्यंत ५० टक्के सूट मिळणार असल्याने थकबाकीदारांनी ७५ टक्के सूट योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरा करावी तसेच सन २०२०-२१ मधील देयक रक्कम भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत वाढविली असल्याने ही रक्कमही लवकरात लवकर भरावी.
सन २०२०-२१ करिता मालमत्ता कर विभागाकरिता ६०० कोटी जमा होतील असे सुधारित उद्दिष्ट आयुक्तांनी जाहीर केले होते. सद्यस्थितीत यावर्षी ४५२.३५ कोटी इतकी रक्कम मालमत्ता करापोटी जमा झाली असून यापुढील २० दिवसात ६२५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार ॲक्शन प्लॅन तयार असून मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आठ विभागांकरिता उद्दिष्ट ठरवून दिले आहेत. यामध्ये थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने विभागनिहाय यादी तयार केली आहे. 

मालमत्ता कर भरणे बंधनकारक
n१५ मार्चपर्यंत दंडात्मक रकमेवर ७५ टक्के सूट व त्यानंतर ३१ मार्चपर्यंत सूट कमी होऊन ५० टक्के होणार असल्याने या संधीचा लाभ जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घ्यावा यासाठी ठोस प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. 
nलघु उद्योजकांनीही त्यांची मूळ मालमत्ता कर रक्कम भरावी याकरिता कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असून त्याचा भरणा करणे हे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. त्यामुळे मालमत्ता कर विभागाने पूर्ण क्षमतेने नियोजनबद्ध काम करावे असे सांगितले. 

Web Title: Encourage arrears to avail Abhay Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.