स्वच्छताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्यासाठी स्पर्धेद्वारे प्रोत्साहन, महापालिकेचा उपक्रम

By योगेश पिंगळे | Published: November 11, 2022 05:26 PM2022-11-11T17:26:31+5:302022-11-11T17:26:51+5:30

या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-संस्थांना ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहेत.

Encouragement through competition for public orientation of sanitation activities, Navi mumbai municipal initiatives | स्वच्छताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्यासाठी स्पर्धेद्वारे प्रोत्साहन, महापालिकेचा उपक्रम

स्वच्छताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्यासाठी स्पर्धेद्वारे प्रोत्साहन, महापालिकेचा उपक्रम

Next

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेले स्वच्छताविषयक विविध उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरिता तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. हॉटेल्स, शाळा, सोसायट्या, मार्केट, शासकीय कार्यालये व हॉस्पिटल स्तरावर स्वच्छता स्पर्धा राबविण्यात येणार आहेत.

नवी मुंबई शहरातील नागरिकांना कचरा वर्गीकरण व कच-यावरील प्रक्रिया तसेच इतर स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे तसेच या बाबींमध्ये सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई शहरातील हॉटेल्स, शाळा, गृहनिर्माण संस्था, मार्केट असोसिएशन, शासकीय कार्यालये आणि हॉस्पिटल या प्रमुख सहा गटांमध्ये स्वच्छता स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेचे गुणांकन करण्याकरिता ठराविक निकष निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने निर्मितीच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरण, कच-यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्थापन, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा व कोविड-१९ या आजाराचा  प्रसार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या नियमांचे पालन अशा विविध बाबींवर भर देण्यात आलेला आहे.

या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणा-संस्थांना ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग अपेक्षित असून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या संस्थांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही दैनंदिन जीवनातील नियमित सवय व्हावी जेणेकरून शहर स्वच्छतेला बळकटी येईल या भूमिकेतून सोसायट्यांपासून ते हॉटेलसारख्या पर्यटक मोठ्या संख्येने येणा-या व्यावसायिक संस्थांना स्वच्छतेच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी विविध सहा गटात स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ नवी मुंबई मिशन यशस्वीपणे राबविण्यास सक्रिय सहभाग नोंदवावा- राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म.पा.

Web Title: Encouragement through competition for public orientation of sanitation activities, Navi mumbai municipal initiatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.