ऐरोली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:42 AM2018-12-10T00:42:00+5:302018-12-10T00:42:30+5:30
ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाजूला स्कायवॉकवर आता अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. याचा सर्वाधिक त्रास येथील आयटी पार्क आणि कॉल सेंटरमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना होत आहे
नवी मुंबई : ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाजूला स्कायवॉकवर आता अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. याचा सर्वाधिक त्रास येथील आयटी पार्क आणि कॉल सेंटरमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना होत आहे. या अतिक्रमणाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे-बेलापूर महामार्गावर ऐरोली रेल्वेस्थानकाशेजारी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून एमआयडीसीने स्कायवॉक बांधला आहे. परिसरातील आयटी आणि इतर कंपन्यांत काम करणाºया कर्मचाºयांच्या दृष्टीने हा स्कायवॉक उपयुक्त ठरला आहे. या स्कायवॉकवरून दिवस-रात्र प्रवाशांचा वावर असतो. विशेषत: रात्रपाळीवरून परतणाºया कर्मचाºयांसाठी हा स्कायवॉक सोयीचा ठरला आहे; परंतु मागील काही दिवसांपासून या स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाले आहे. बूट पॉलिश, सरबत तसेच अन्य थंड पेयविक्रेते, खाद्यपदार्थ आदीचे स्कायवॉकवर अतिक्रमण वाढले आहे.