स्थानकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सुरक्षारक्षकांची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:23 AM2018-08-22T01:23:06+5:302018-08-22T01:23:25+5:30

शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे

Encroachment of hawkers in the station; Protective eyes | स्थानकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सुरक्षारक्षकांची डोळेझाक

स्थानकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सुरक्षारक्षकांची डोळेझाक

Next

नवी मुंबई : शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. स्थानकाच्या इमारतीसह, फलाटावर फेरीवाले बस्तान मांडून बसत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यापैकी अनेक फेरीवाले शेगडीचा वापर करत असल्याने दुर्घटनेची शक्यता असतानाही सिडकोच्या सुरक्षारक्षकांसह रेल्वे पोलिसांची डोळेझाक गंभीर परिणामाला कारणीभूत ठरू शकते.
शहरातील अनेक रेल्वेस्थानके तांत्रिक बाबींमुळे प्रवाशांच्या सोयीऐवजी गैरसोयीचीच अधिक ठरत आहेत. अशातच अनधिकृत फेरीवाल्यांनी समस्येत भर टाकली आहे. फलाटांसह रेल्वेस्थानकाच्या इमारतीच्या कानाकोपऱ्यात त्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे. फलाटावर उभ्या असलेल्या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची अडवणूक होत आहे, तर ज्या ठिकाणी सिडकोने व्यावसायिक गाळे तयार केले आहेत, त्याच्या बाहेरची मोकळी जागादेखील विनापरवाना फेरीवाल्यांनी व्यापली आहे. त्यात फळ विक्रेत्यांसह भेळ, पाणीपुरी विक्रेत्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी छोट्या गॅस शेगडीचा वापर करून शिजवून अथवा भाजून विकल्या जाणाºया खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवले जात आहेत. रेल्वेप्रवाशांच्या रहदारीवरच त्यांच्याकडून धंदा मांडला जात आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतरही रेल्वेस्थानकात सिडकोच्या सुरक्षारक्षकांचे त्यांना अभय मिळत आहे.

Web Title: Encroachment of hawkers in the station; Protective eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.