जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 04:59 PM2022-10-05T16:59:49+5:302022-10-05T17:00:47+5:30

सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Enterprising School Award to Jasai High School | जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार

जासई हायस्कूलला उपक्रमशील शाळा पुरस्कार

Next

उरण - जासईतील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजला उपक्रमशील शाळा या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेकडून दरवर्षी  दि. बा. पाटील यांच्या नावाने उपक्रमशील शाळांना हा पुरस्कार दिला जातो.यावर्षी उपक्रमशील शाळा या पुरस्कारासाठी जासईतील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेजची निवड करण्यात आली आहे.

४ ऑक्टोबर रोजी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांनी  पुरस्कार स्वीकारला.पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, अतुल पाटील, सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण रयत सेवक संघाचे महाराष्ट्राचे समन्वयक नुरा शेख, सुरेश ठाकूर आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Web Title: Enterprising School Award to Jasai High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.