नवी मुंबई : महानगरपालिकेने शहरातील ११ ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर केला आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत शहरातील सिनेमागृह, तरण तलाव बंद राहणार आहेत. फूड कोर्ट, हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, एमआयडीसीमधील सर्व कारखाने सुरू राहणार आहेत.नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. जनजीवन सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करताना, प्रादुर्भाव वाढणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत शहरातील स्थिती काय राहणार, याविषयी आयुक्त अभिजीत बांगर यांनी आदेश जारी केला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. दुकानदार व ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मोठे सार्वजनिक व खासगी समारंभ अनुज्ञेय नाहीत. लग्नकार्यासाठी ५० पेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थित राहू नये. अंत्यविधीसाठी फक्त २० नागरिकांनाच परवानगी मंजूर केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे निदर्शनास आल्यास महानगरपालिकेच्या वतीने दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यास मनाई असणार आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करावे. खासगी अस्थापनांनी त्या पद्धतीने कामाचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कामाच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग, हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटाइजरची व्यवस्था करणे आवश्यक आहे, कार्यालयातील कामकाजाची ठिकाणे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावीत, कामाच्या ठिकाणी जेवणाच्या सुट्टीमध्ये व इतर वेळीही कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.असे आहेत शहरातील कंटेनमेंट झोनच्त्रिमूर्ती सदन दारावे गाव बेलापूरच्विशाल प्राइड प्लॉट नंबर ५९ सेक्टर ५० सीवूडच्दीपसागर हौसिंग सोसायटी भूखंड क्रमांक २५ सेक्टर १९च्घर क्रमांक ७५८ सेक्टर २० नेरुळ गावच्शिवशक्ती अपार्टमेंट ९४/७ सेक्टर १० नेरुळच्वाशी गाव सेक्टर ३१ प्लॉट लाइन शिवतर टॉवरच्प्रार्थना प्लॉट नंबर ४८ सेक्टर २८ वाशीच्महावीर अमृत सोसायटी भूखंड क्रमांक २ सेक्टर १९ सानपाडाच्निवारा सोसायटी सेक्टर ३ सानपाडाच्ओमकार सोसायटी सेक्टर १० ऐरोलीच्दत्तकृपा अपार्टमेंट बिंदुमाधवनगर दिघापुढील गोष्टींना परवानगी मिळणारहॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट व बार यांना ५ आॅक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवागनी मिळणार आहे, संबंधित आस्थापनांना पर्यटन विभागाकडून स्वतंत्रपणे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.मनपा क्षेत्रातील सर्व औद्योगिक आणि उत्पादक युनिट्समध्ये अत्यावश्यक वस्तुंसह इतर वस्तुंचे उत्पादन सुरू करण्यासाठी परवानगी असणार आहे.आॅक्सिजनची वाहतूक करणाºया वाहनांना संपूर्ण राज्य व राज्याबाहेर पूर्णवेळ वाहतूक करण्याची परवानगी असेल. आॅक्सिजनचे उत्पादक आणि पुरवठादार यांच्यावर वाहतुकीचे कोणतेही प्रतिबंध राहणार नाही.