खारघरमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:09 AM2018-07-15T02:09:07+5:302018-07-15T02:09:09+5:30
ओडिसा येथील पुरीमध्ये धार्मिक तसेच लाखो भक्तांच्या उपस्थित पार पडणारी भगवान जगन्नाथ रथयात्रा खारघरमध्ये शनिवारी काढण्यात आली
पनवेल : ओडिसा येथील पुरीमध्ये धार्मिक तसेच लाखो भक्तांच्या उपस्थित पार पडणारी भगवान जगन्नाथ रथयात्रा खारघरमध्ये शनिवारी काढण्यात आली होती. जे भक्त प्रत्यक्ष पुरी या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत, अशा भक्तांसाठी रथयात्रेचे आयोजन खारघर शहारात मागील अनेक वर्षांपासून केले जाते.
खारघर बेलपाडा या ठिकाणाहून सुरू झालेली ही रथयात्रा सेक्टर १२ येथील शिवमंदिरात विसावली. गेल्या नऊ वर्षांपासून या यात्रेचे आयोजन शहरात करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ यांच्यासाठी तयार केलेला लाकडी रथ भक्त मोठ्या दोरखंडाच्या साहाय्याने ओढतात. या वेळी ओडिसामधील संस्कृतीचे दर्शन आपणास पाहावयास मिळते. पारंपरिक वेशभूषा, वाद्य, ढोलक यांच्या गजरात रथयात्रा पुढे जात असते. शहरातील सेक्टर १२ येथील शिवमंदिरात या वेळी मंदिर तयार करण्यात येत असून हा उत्सव तीन दिवस चालतो.
खारघर शहारात वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ तसेच ठाणे परिसरातून भक्तांचा ओघ
भक्तीमय वातावरणात निघाली रथयात्रा
वाद्य आणि पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून ओडिसामधील संस्कृतीचे दर्शन