लोकमत न्युज नेटवर्क वैभव गायकर,पनवेल:रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी' हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन पार पडलेल्या 'नमो खारघर मॅरेथॉन २०२४' स्पर्धेत तब्बल १९ हजार ६०१ स्पर्धकांनी सहभाग घेत यंदाचीही मॅरेथॉन उदंड केली.
या स्पर्धेतील पुरुष खुला गटात मृणाल सरोदे तर महिला खुला गटात अर्चना जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावित विजेतेपदाचा किताब पटकावला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॅरेथॉनने आतापर्यंतच्या सहभागाचे रेकॉर्ड यावेळी मोडले.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत होते.
यंदाची हि स्पर्धा १४ वी होती. स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर, अशा गटात मॅरेथॉन झाली. विजेत्या स्पर्धकांना रक्कम स्वरूपात तसेच मेडल, सर्टिफिकेट आदी बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी, संजय भगत, समीर कदम आदींसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेते स्पर्धक -पुरुष खुला गट - अंतर १० किलोमीटरप्रथम क्रमांक- मृणाल सरोदे (२५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
महिला खुला गट - अंतर १० किलोमीटरप्रथम क्रमांक- अर्चना जाधव (२५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ट्रॅकसूट, प्रमाणपत्र, मेडल.)
१७ वर्षाखालील मुले गट- अंतर ०५ किलोमीटरप्रथम क्रमांक- राज भगत (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
१७ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटरप्रथम क्रमांक- मयुरी चव्हाण (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
१४ वर्षाखालील मुले गट- अंतर०५ किलोमीटरप्रथम क्रमांक- ओमकार पाटील (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
१४ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटरप्रथम क्रमांक- पुजा चव्हाण (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
खारघर दौड - (वैयक्तिक, शालेय, सोयायटी, व इतर अशा चार गटात )- अंतर ०३ किलोमीटर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक दौड (पुरुष गट )- अंतर ०२ किलोमीटर प्रथम क्रमांक- अनिल खंडेलवाल (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)
ज्येष्ठ नागरिक दौड (महिला गट )- अंतर ०२ किलोमीटर प्रथम क्रमांक- अल्फीया अदिब (०५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र)