पनवेल नगरपालिकेत निरोपाचे वातावरण

By admin | Published: September 30, 2016 03:54 AM2016-09-30T03:54:00+5:302016-09-30T03:54:00+5:30

रायगड जिल्ह्यातील सर्वात जुन्या पनवेल नगरपालिकेचा शुक्रवार अखेरचा दिवस असणार आहे. शनिवारपासून नगराध्यक्षा आणि नगरसेवकांच्या नावापुढे माजी हे पद लागणार आहे

Environment of Niropa in Panvel Municipality | पनवेल नगरपालिकेत निरोपाचे वातावरण

पनवेल नगरपालिकेत निरोपाचे वातावरण

Next

- नितीन देशमुख,  पनवेल
रायगड जिल्ह्यातील सर्वात जुन्या पनवेल नगरपालिकेचा शुक्रवार अखेरचा दिवस असणार आहे. शनिवारपासून नगराध्यक्षा आणि नगरसेवकांच्या नावापुढे माजी हे पद लागणार आहे, त्यामुळे दोन दिवस नगरपालिकेतील वातावरण निरोपाची कामे उरकण्याचे दिसत आहे. सामान्य माणूस पालिकेकडील काम उरकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.
नवीन महानगर पालिकेच्या निवडणुकीची व नवीन आयुक्त कोण असणार याची सर्वत्र चर्चा रंगलेली दिसत होती. महाराष्ट्र शासनाने २६ सप्टेंबरला रात्री अधिसूचना काढून पनवेल नगरपालिका क्षेत्रासह २९ महसुली गावांची नवी महानगरपालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येत असल्याची अधिसूचना काढली. त्यामुळे अस्तित्वात असलेली नगरपालिका शुक्र वार ३0 सप्टेंबर रोजी बरखास्त होणार आहे.
पनवेल महानगरपालिका झाल्याने आता नवीन निवडणुका केव्हा होतील, सहा महिने लागतील का जास्त वेळ लागेल तोपर्यंत आयुक्तांचा कारभार असणार आहे. आयुक्तपदी आय.ए.एस. अधिकारी कोण असणार, शिंदे की जाधव याचीही चर्चा नगरपालिकेत रंगली आहे. अनेक महानगरपालिकेतील आयुक्तांच्या कारभाराच्या पध्दतीचे किस्से ऐकलेले असल्याने कर्मचारीही आतापर्यंत काम करण्याची असलेली मानसिकता बदलावी लागणार म्हणून धास्तावलेला दिसतो आहे. निवडणुकांना विलंब झाल्यास, सामान्य माणसाला यापुढे आपले काम लवकर होईल की नाही याची धास्ती वाटत आहे. याशिवाय शहरातील कर प्रणालीत वाढ होणार असून सोयी- सुविधा कशा प्रकारे मिळतील, याचीही चर्चा परिसरात होताना दिसते. निरनिराळे दाखले नेण्यासाठी व थकबाकी भरण्यासाठी लोकांच्या नगरपरिषदेत रांगा लागल्या होत्या.

Web Title: Environment of Niropa in Panvel Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.