साथीचे रोग प्रतिबंधात्मक मोहीम

By admin | Published: September 9, 2016 03:21 AM2016-09-09T03:21:52+5:302016-09-09T03:21:52+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागाने हिवताप, डेंगी या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे

Epidemic preventive campaign | साथीचे रोग प्रतिबंधात्मक मोहीम

साथीचे रोग प्रतिबंधात्मक मोहीम

Next

नवी मुंबई: महापालिकेच्या आरोग्य विभागाने हिवताप, डेंगी या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिरे घेतली जात आहेत. तसेच हस्तपत्रके, प्रदर्शन संच, प्रात्यिक्षके तसेच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त ध्वनीफितीचे प्रसारण या माध्यमातून उपाययोजनांबाबत व्यापक स्वरु पात माहिती देण्यात येत आहे.
सद्यस्थितीत अनियमति पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून तेथे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका वाढला आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. रु ग्ण संशोधन कार्यवाही अंतर्गत ५२00८ घरांना भेटी देऊन ५८७ संपर्क रक्त नमुने आणि ३00४ मास रक्त नमुने घेवून तपासणी करण्यात आली आहे. घरांतर्गत डास उत्पत्ती शोध मोहिमेमध्ये ६0४३९ घरांना भेटी देत आढळून आलेली १२२ डास उत्पत्ती स्थळे पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ४0५0४ घरांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली असून ५२९५८ घरांमध्ये रासायनिक धूरीकरण करण्यात आले आहे.
याशिवाय अतिसंवेदनशील कार्यक्षेत्रांमध्ये घरांतर्गत डास उत्पत्ती विशेष मोहिम राबविण्यात आली. याअंतर्गत १७९७४७ घरांमध्ये ३३९५१२ डास उत्पत्ती स्थळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळून आलेली १२४६ दूषीत स्थाने ो नष्ट करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून जाहिर करण्यात आले आहे.

Web Title: Epidemic preventive campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.