- अनंत पाटीलनवी मुंबई : काळाबाजाराला आळा घालून स्वस्त धान्य थेट गरिबापर्यंत पोहचावे, या उद्देशाने राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाने शिधापत्रिकेशी आधार लिंक करण्याची योजना जाहीर केली. त्यानुसार कार्यवाहीसुद्धा झाली. परंतु संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे आधार लिंक चुकीच्या पद्धतीने झाले. त्याचा फटका आता शिधापत्रिकाधारकांना बसत आहे.धान्य व रॉकेल घेताना आधार लिंक तपासून पाहिले जाते. तसेच अंगठ्याचा ठसाही तपासून पाहिला जातो. परंतु चुकीच्या पद्धतीने आधार लिंक झाल्याने अनेक शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.शिधापत्रिकांचे संगणकीकरण करताना आधार लिंक व इतर माहिती अपलोड करण्यात आली. तसेच संबंधित शिधापत्रिकाधारकांचे अंगठ्याचे ठसेही घेण्यात आले. वाशी येथील शिधावाटप कार्यालय (फ ४१) अंतर्गत नवी घणसोली ते बेलापूर या दरम्यान एकूण १0३ शिधावाटप दुकाने आहेत. त्यापैकी ९ दुकानांचा विविध कारणांमुळे परवाना रद्द करण्यात आला आहे. उर्वरित ९४ दुकानांतून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप केले जाते. या वाशी कार्यालयाअंतर्गत एकूण १ लाख ४४ हजार ८४६ शिधापत्रिकाधारक नोंदीत आहेत. यापैकी एक हजारापेक्षा अधिक शिधापत्रिकांचे आधार लिंक चुकीच्या पद्धतीने झाले आहे. केशरी कार्डधारक म्हणून गेल्या वर्षी आधार लिंक केले. मात्र धान्य घेण्यासाठी गेल्यावर दुकानदाराने आधार क्रमांक जुळत नसल्याचे कारण देत माघारी पाठविल्याची तक्रार घणसोलीत येथील लताबाई विष्णू मेंढे या वयोवृद्ध महिलेने ‘लोकमत’कडे केली आहे.>वाशी कार्यालयातील शिधापत्रिकांचा तपशीलअंत्योदय २0१, विस्तारित अंत्योदय-४८, द्वितीय विस्तारित- १५0 , तृतीय विस्तारित अंत्योदय १00, लाभार्थी- ४८९, केशरी प्राधान्य ५३ हजार १९ आणि उर्वरित केशरी ३८ हजार ५६८, शुभ्र- ४९ हजार ३९६, बंद गिरणी कामगार १३, तात्पुरते प्राधान्य १९१९, उर्वरित -३१९, निराधार महिला फक्त एक, बेघर- ६२३ अशी एकूण १ लाख ४४ हजार ८४६ शिधापत्रिकांची संख्या आहे.>बायोमेट्रिक मशिनच्या तांत्रिक अडचणींमुळे गरजू लाभार्थींना शिधावाटप दुकानातून धान्य वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील सर्व शिधावाटप दुकानातील बायोमेट्रिक आधार लिंक यंत्रणेची तपासणी करण्यात येणार आहे.- एकनाथ पवार, शिधावाटप अधिकारी,वाशी कार्यालय ( फ४१),
शिधापत्रिका आधार लिंकमध्ये त्रुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:22 AM