पर्यटन विकासासाठी समिती स्थापन

By Admin | Published: January 5, 2017 06:08 AM2017-01-05T06:08:45+5:302017-01-05T06:08:45+5:30

शहर वेगाने पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. शहराचा पर्यटनदृष्ट्या नियोजनबद्ध विकास होण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी प्रथमच नियोजन व पर्यटन विकास समितीची स्थापना केली.

Establishment of Committee for Tourism Development | पर्यटन विकासासाठी समिती स्थापन

पर्यटन विकासासाठी समिती स्थापन

googlenewsNext

अलिबाग : शहर वेगाने पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित होत आहे. शहराचा पर्यटनदृष्ट्या नियोजनबद्ध विकास होण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी प्रथमच नियोजन व पर्यटन विकास समितीची स्थापना केली. गटनेता आणि उपनगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीनंतर बुधवारी स्थायी समितीसह विषय समिती सभापतिपदाच्या निवडीही बिनविरोध झाल्या. पाच विषय समित्यांच्या निवडीत तीन समित्यांवर महिला सभापती, तर दोन समित्यांवर पुरु षांना सभापती होण्याचा मान मिळाला.
अलिबाग शहरामध्ये जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक पर्यटन व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून गोवा आणि केरळ राज्याने उत्तुंग अशी प्रगती केली आहे. तेथे पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आली आहे. त्याच धर्तीवर अथवा त्याहीपेक्षा थोडी अधिक प्रगती साधायची असेल, तर अलिबाग शहराचा पर्यटनाच्याबाबतीत नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे. यासाठी अलिबाग नगरपरिषदेतीन शेकाप सत्ताधाऱ्यांनी प्रथमच नियोजन व पर्यटन विकास समितीची स्थापना केली आहे. त्या समितीच्या सभापतिपदी माजी उपनगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सुरक्षा शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या सहा निश्चित करण्यात आली आहे, तसेच पाच विषय समित्या राहणार असल्याचे पत्र अलिबाग नगरपालिकेचे गटनेते प्रदीप नाईक यांनी पीठासीन अधिकारी यांना दिले. त्यानुसार बुधवारी अलिबाग नगरपरिषदेच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नगरपरिषदेच्या स्थायी समितीवर नगराध्यक्ष प्रशांत मधुसुदन नाईक हे सभापती असणार आहेत. या समिती सदस्यांमध्ये वीज व सार्वजनिक बांधकाम समिती सभापती विजय (अजय) झुंजारराव, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती मानसी संतोष म्हात्रे, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती राकेश वामन चौलकर, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली राजन ठोसर, नियोजन व पर्यटन विकास समिती सभापती सुरक्षा जगदीश शहा यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
यावेळी सभेसाठी प्रांताधिकारी सर्जेराव सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गोसावी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक आदींसह नगरसेवक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Establishment of Committee for Tourism Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.