शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
4
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
5
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
6
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
8
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
9
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
10
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
11
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
12
"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?
13
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
14
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
15
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
16
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
17
प्रेरणादायी! ४ वेळा नापास, परीक्षेच्या आदल्या रात्री पॅनिक अटॅक; UPSC क्रॅक करून केली कमाल
18
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
19
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला चॅम्पियन; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
20
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा

गोरक्षणाच्या नावाखाली हप्तेवसुली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 3:12 AM

पनवेलमधील शिवसेना पदाधिकारी गोरक्षणाच्या नावाखाली गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करत असल्याची चित्रफीत प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेलमधील शिवसेना पदाधिकारी गोरक्षणाच्या नावाखाली गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करत असल्याची चित्रफीत प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेश पांडे व डी. एन. मिश्रा या दोघांचीही शिवसेनेने तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. नवी मुंबई, तळोजा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शीतगृह असून त्यामध्ये निर्यात करण्यासाठीचे मांस साठविले जाते. प्रक्रिया केलेले मांसही याच ठिकाणी ठेवण्यात येते व नंतर ते विदेशामध्ये पाठविण्यात येते. याशिवाय देवनार कत्तलखान्याकडे जाणाऱ्या शेळ्या, मेंढ्या व इतर प्राणीही सायन - पनवेल महामार्गावरून जातात. यापूर्वी गोमांस व प्राण्यांची वाहतूक करणारी वाहने कळंबोलीत गोरक्षकांनी अडविली होती. नवी मुंबई परिसरामध्येही अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. परंतु प्रामाणिक गोरक्षकांबरोबर हप्तेवसुली करणाऱ्यांचीही चलती सुरू असल्याचे मागील काही महिन्यांपासून बोलले जात होते. एका खासगी वृत्त वाहिनीने चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये येथील शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पांडे व डी. एन. मिश्रा हे दोघे गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करण्याची चर्चा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पांडे यांनी यापूर्वी महामार्गावर एक गाडी पकडली होती. त्याला सेटिंग करण्यास सांगितल्यानंतरही ऐकले नसल्याने आम्ही गाडीच जाळली होती असे मत व्यक्त केले. नंतर त्याच्या मध्यस्थीने मिश्राच्या शिवसेना कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली व तेथे सर्व प्रकारची मदत केली जाणार असल्याचे दोघांनी आश्वासन दिल्याचे स्पष्ट झाले होते. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करण्याचा प्रकार निदर्शनास येताच शिवसेनेने मिश्रा व पांडे दोघांचीही शिवसेनेमधून हकालपट्टी केली आहे. वास्तविक पक्षातून हकालपट्टी केल्याने हा विषय संपलेला नसून पनवेल परिसरामध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमध्ये किती सत्य आहे, या दोघांनी यापूर्वी अशाप्रकारे गोमांस वाहतुकीसाठी मदत केली होती का? आतापर्यंत केलेल्या कामगिरीविषयी चौकशी करण्याची मागणी होवू लागली आहे. अशाप्रकारे चुकीचे काम त्यांनी केले असेल किंवा इतरही कोणी करत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. सखोल चौकशी झाली नाही तर भविष्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडेही संशयाने पाहिले जाईल असे मत व्यक्त होत आहे. मिश्रा याने महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग ९० मधून निवडणूक लढविली होती. यामध्ये त्याला पराभवास सामोरे जावे लागले होते. राजेश पांडेशी संपर्क नाहीगोमांस वाहतुकीस मदत करण्याच्या चित्रफितीमध्ये राजेश पांडेची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसत आहे. यापूर्वी सेटिंग न झाल्याने एक वाहन पेटवून दिल्याचेही तो बोलताना दिसत असून त्यानेच मिश्राबरोबर मिटिंग घडवून आणली होती. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, परंतु संपर्क होवू शकला नाही. डी. एन. मिश्रांनी फेटाळले आरोप याविषयी माहिती घेण्यासाठी डी. एन. मिश्राशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मी जवळपास दोन दशकांपासून या परिसरामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. आतापर्यंत मी कोणाकडेही खंडणी मागितलेली नाही. कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. मला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. वास्तविक निवडणुकीपूर्वीच हे करण्यात येणार होते. माझी प्रगती पहावत नसल्याने हे प्रकार करण्यात आले आहेत. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कोणालाही विचारा मी कधीच चुकीची कामे केलेली नाहीत. याविषयी कायदेशीर सल्ला घेवून आम्ही पुढील भूमिका निश्चित करणार आहोत. मी निर्दोष असून, हे भविष्यात सिद्ध होईल असा दावाही त्यांनी केला आहे. जवळपास तीन वर्षांपासून काही जण माझे नुकसान करण्यासाठी मागे लागले असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.